Download App

उन्हाळ्यात त्वचाच नाही तर केसांचं आरोग्यही येतं धोक्यात; केसांची निगा राखण्याच्या टिप्स जाणून घ्या…

summer आला की त्वचेची काळजी घेणे नितांत गरजेचे असते. मात्र त्वचे सोबतच उन्हाळ्यामध्ये केसांचं आरोग्य देखील तेवढेच धोक्यात येतं.

Tips for summer hair Care routine : उन्हाळा आला की त्वचेची काळजी घेणे नितांत गरजेचे असते. मात्र त्वचे सोबतच उन्हाळ्यामध्ये केसांचं आरोग्य देखील तेवढेच धोक्यात येतं. त्यामुळे केसांची उन्हाळ्यामध्ये काळजी घेणे देखील तेवढेच गरजेचे असते. यासाठी काही खास टिप्स जाणून घेऊ…

अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक शांत; विरोधी पक्षनेता कोण होणार? यावरून संभ्रम

उन्हाळ्यामध्ये अधिक घाम येतो. त्यामुळे त्वचेची आर्द्रता वाढते. त्यामुळे त्वचेवरील छिद्र उघडतात. त्यामुळे त्वचा कमजोर पडते आणि केसांचा पोत बिघडतो. त्यामुळे केस गळती आणि कोंड्यासारख्या समस्या वाढतात. तसेच केसांच्या आतील त्वचा ओली राहिल्याने खाज देखील सुटते. स्किन एक्सपर्ट्स आणि कॉस्मेटॉलॉजिस्ट यांच्या मते आर्द्रता आणि उष्णता प्रकृतीवर विपरीत परिणाम करतात ज्यामुळे केस तुटतात किंवा गळतात. यासाठी केसांची काळजी घेताना त्यांना नियमित धुणं व्यवस्थित वाळवण यामुळे केसांचा नुकसान होत नाही.

रसिकलाल एम धारिवालांच्या जन्मदिनाची परंपरा कायम; 200 हून अधिक रक्तदात्यांचं अमूल्य रक्तदान

तसेच नियमित केस जरी धुवायचे असतील तरी दररोज केस धुणं चुकीचं आहे. ज्यामुळे केसांचं नॅचरल ऑइल नष्ट होतं त्यामुळे एका दिवसाआड किंवा चार ते पाच दिवसानंतर केस धुतले गेले पाहिजेत. केवळ शाम्पो वापरल्याने केस रुक्ष होतात. त्यामुळे केसांना शाम्पू नंतर कंडिशनर लावून अत्यंत गरजेचे आहे त्यामध्ये योग्य प्रमाणात प्रोटीन असलेलं कंडिशनर निवडावं. तसेच आठवड्यातून एकदा केसांना डीप कंडिशनिंग करावं.

VIDEO : विरोधी पक्षनेतेपदाचा निर्णय कधी? एकनाथ शिंदेंनी केलं स्पष्ट…

उन्हाळ्यात जास्त विंचरल्याने देखील केस खराब होतात. केसांमधील आर्द्रता आणि नॅचरल ऑइल यामुळे कमी होते त्यामुळे शक्यतो फायबरच्या काँग्रेसचा वापर करावा. त्याचबरोबर पंधरा दिवसातून एकदा हेअर स्पा देखील शक्य असल्यास घ्यावे ज्यामुळे केसांना डीप कंडिशनिंग मिळतं तसेच केसांमध्ये अनावश्यक ओलावा कमी होतो.

संतोष दानवे-पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांत तू तू- मैं मैं, कार्यकर्त्यांकडून मारहाण; डॉक्टरांच्या आई-वडिलांच्या आरोप..

केसांना दाट आणि मजबूत ठेवण्यासाठी आहारामध्ये प्रोटीन आणि विटामिन युक्त गोष्टींचा समावेश करावा ज्यामध्ये व्हिटॅमिन सी आयन झिंक ओमेगा थ्री फॅटी ऍसिड यांचा समावेश आहे. केसांना तेलाने मालिश केल्याने केसांच्या आतील त्वचेमध्ये ब्लड सर्कुलेशन वाढतं आणि केसांना योग्य पोषण मिळतं.

आत्महत्या करावी वाटतेय; स्वारगेट प्रकरणातील पीडितेच्या फोनने वसंत मोरेंना अश्रू अनावर

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये केस वारंवार विंचरावे लागत असतील तर यासाठी सिलिकॉन युक्त सिरम किंवा नॅचरल हेअर मास्क फायदेशीर ठरतो. उन्हामुळे केसांची चमक जाते ते वृक्ष होतात. त्यामुळे बाहेर पडताना डोक्यावर स्कार्फ असणे गरजेचे आहे. तसेच उन्हाळ्यामध्ये स्विमिंग पूल च्या पाण्यात गेल्याने क्लोरीन मुळे केस खराब होतात त्यामुळे स्विमिंग करताना कॅप लावणं गरजेचं आहे.

त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे हेअर स्टाईल करण्यासाठी वापरले जाणारे स्प्रे आणि इतर रासायनिक उत्पादन केसांना धोका पोहोचवतात त्यामुळे शक्यतो घरगुती गोष्टींपासून बनवलेल्या हेअर मास्क किंवा तेलांचा वापर करणे योग्य ठरतं.

follow us