सावधान! तुम्हीही पार्लर किंवा सॅलॉनमध्ये जाऊन केस धुताय? निर्माण होऊ शकतो हा धोका

parlor or salon सॅलॉनमध्ये केस धुताना मानेची स्थिती आणि खूप वेळेसाठी मान लटकत ठेवणे यामुळे स्ट्रोक येऊ शकतो.

Parlor Or Salon

Be careful! Do you also go to a parlor or salon to wash your hair? This is a risk that may arise : सावधान जर तुम्ही दाढी कटिंग किंवा महिला वर्गांमध्ये सॅलॉन किंवा पार्लरमध्ये जात असाल, तर तुम्हाला काही गोष्टींवर लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे. कारण नुकत्याच समोर आलेल्या एका अहवालामध्ये हे समोर आलं आहे की, सॅलॉनमध्ये केस धुताना मानेची स्थिती आणि खूप वेळेसाठी मान लटकत ठेवणे यामुळे स्ट्रोक येऊ शकतो.

धक्कादायक! पत्नी अन् सासरच्या लोकांकडून होणाऱ्या त्रासामुळे तरुणाची आत्महत्या

याला ‘ब्युटी पार्लर स्ट्रोक सिंड्रोम’ म्हटलं जातं. मात्र हे प्रत्येक वेळी होत नाही. पण अशा प्रकारे रिस्क घेणे देखील योग्य नाही. अमेरिकन जर्नल ऑफ इमर्जन्सी मेडिसिनमध्ये छापण्यात आलेल्या एका अहवालामध्ये हा दावा करण्यात आला आहे. या अभ्यासामध्ये स्ट्रोकचे 22 प्रकरणं अभ्यासली गेली आहेत. त्यातून ही माहिती समोर आली आहे. यामध्ये सांगितलं गेलं आहे की, सॅलॉनमध्ये मानेची चुकीची पोझिशन स्ट्रोकचं कारण ठरू शकते. ज्याचा महिलांमध्ये जास्त धोका आहे.

अजित पवारांच्या नोटीसनंतरही जगतापांच्या सभा! संगमनेरमधील मोर्चामध्ये भगवी टोपी टाळत मवाळ भूमिका

कारणं अनेकदा ब्युटी ट्रीटमेंट घेताना किंवा रेग्युलर हेअर वॉशसाठी देखील महिला पार्लरला जाणं पसंत करतात. मात्र केस धुताना मान पाठीमागच्या बाजूला खूप वेळपर्यंत झुकवणे चुकीचे ठरू शकते. यामुळे मानेच्या नसांवर दबाव पडतो. ह्या नसा मेंदूपर्यंत रक्तपुरवठा करतात. हे नसा दबल्या गेल्यामुळे स्ट्रोक येऊ शकतो. या अभ्यासातील आकडेवारीनुसार 80 टक्के महिला अशा होत्या. ज्यांच्यामध्ये हे लक्षणे दिसून आले. त्यात जास्त प्रमाण हे पार्लरमध्ये केस धुणाऱ्या महिलांचं होतं यामध्ये चक्कर येणे संतुलन नसणे,डोकेदुखी, उल्टी, बोलण्यामध्ये समस्या निर्माण होणे, शरीराच्या एका भागामध्ये लकवा किंवा अशक्तपणा जाणवणे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते ‘स्मार्ट सुनबाई’चा टिझर लाँच, ‘या’ तारखेला येणार प्रेक्षकांच्या भेटीला

यावर तज्ज्ञांनी सांगितलं की, या प्रकारचे प्रकरणं अत्यंत कमी समोर येतात. पण अशाप्रकारे पार्लर किंवा सॅलॉनमध्ये केस धुताना मान लटकवत किंवा ताठून ठेवणे योग्य नाही. त्यामुळे स्ट्रोक येऊ शकतो. त्यामुळे काही गोष्टींचं गोष्टींची काळजी घ्या. केस धुताना डोकं किंवा मान मागच्या बाजूला जास्त झुकवू नका. मानेसाठी टॉवेल किंवा तक्क्याचा वापर करा. असा सल्ला देतात.

 

follow us