VIDEO : विरोधी पक्षनेतेपदाचा निर्णय कधी? एकनाथ शिंदेंनी केलं स्पष्ट…

VIDEO : विरोधी पक्षनेतेपदाचा निर्णय कधी? एकनाथ शिंदेंनी केलं स्पष्ट…

Eknath Shinde On Opposition Leader of Assembly : राज्यात विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू (Maharashtra Politics) झालंय, परंतु अजून विरोधी पक्षनेतेपदाचा निर्णय मात्र झालेला नाहीये. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी (Eknath Shinde) मोठं वक्तव्य केलंय.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, विधानसभा विरोधी पक्ष नेते पदा संदर्भातला निर्णय हे विधानसभा अध्यक्ष घेतील. महाविकास आघाडीमध्ये (Mahavikas Aghadi) एक मत नाही. विरोधी पक्षनेते पदासाठी जेवढी संख्या आमदारांची हवी, तेवढी संख्या त्यांच्याकडे नाही. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष विरोधी पक्षनेता ठरवतील.

आत्महत्या करावी वाटतेय; स्वारगेट प्रकरणातील पीडितेच्या फोनने वसंत मोरेंना अश्रू अनावर

तसंच एकनाथ शिंदे म्हणाले की, जो औरंगजेबाचं उदात्तीकरण करत असेल त्याच्या विरोधात राजगृहाचा गुन्हा दाखल (Opposition Leader of Assembly) व्हायला हवा. अबू आझमी जर असं बोलत असेल तर त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी.

प्रवीण दरेकर यांनी एक ऑडिओ क्लिप समोर आणली होती. ज्यामध्ये महाविकास आघाडीचे सरकार असताना खोटे गुन्हे दाखल केले जायचे. त्या संदर्भात एसआयटी स्थापन केली होती. त्याचा अहवाल आल्यानंतर आपण ॲक्शन घेऊ, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. तसेच कायदा आणि सुव्यवस्थेवर बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड काढणारे कोणीही असू कुठलेही पक्षाचे असू त्यांच्यावर कारवाई होणार आहे. अशाप्रकारे मुलीची छेड काढणं हे चुकीचं असल्याचं एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलीय.

मढी यात्रा, राणेंचं प्रक्षोभक भाषण, मुख्यमंत्री फडणवीसांनी हस्ताक्षेप करावे नाहीतर…, प्रताप ढाकणे आक्रमक

विरोधी पक्षनेते पदासाठी काँग्रेसने आपला दावा सांगितलाय तरी, शिवसेना (ठाकरे गट) त्यासाठी तयार नाही. कारण ठाकरेंच्या शिवसेनेकडे विधानसभेत आमदार संख्या जास्त आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका वेगळीच दिसतेय. विरोधी पक्षनेते पदासाठी आवश्यक संख्याबळ नसल्याने विरोधक पहिल्याच दिवशी शांत असल्याचं पाहायला मिळालं.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube