Download App

Ahmednagar Loksabha : निलेश लंके खरंच ‘तुतारी’ फुंकणार का ? राजकारणात काहीही होऊ शकते पण…

  • Written By: Last Updated:

Ahmednagar Loksabha seat and Nilesh Lanke: अहमदनगर: लोकसभा निवडणुकीपूर्वी अनेक राजकीय उलथापालथी पाहायला मिळत आहे. यातच नगर दक्षिणमध्ये देखील राजकीय बदलावं दिसून येण्याची शक्यता आहे. नगर दक्षिणमधून सुजय विखे (Sujay Vikhe) यांचे नाव भाजपच्या उमेदवारीसाठी चर्चेत आहे तर आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) हे देखील लोकसभेसाठी (Ahmednagar Loksabha) उत्सुक आहेत. यातच निलेश लंके हे लोकसभा निवडणुकीपूर्वीच शरद पवार गटात प्रवेश करणार अशा चर्चा रंगल्या. लंके व शरद पवार यांची भेट झाल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहे. मात्र लंके यांनी या अफवा असल्याचे बोलत या चर्चा धुडकावून लावल्या. मात्र असे असले तरी लंके यांच्या पक्ष प्रवेशाच्या चर्चा अन त्यातच त्यांच्या चेहऱ्यावर असलेले टेन्शन हे मात्र काही वेगळाच सांगत होते. दरम्यान राजकारणात कधीही काही होऊ शकते असे एक सूचक वक्तव्य लंके यांनी केले आहे, मात्र लंके यांचा पक्ष प्रवेश का लांबला हे मात्र अनुत्तरीतच आहे. असे असले तरी येत्या काळात मोठी राजकीय घडामोड घडणार हे मात्र नक्की.

Ahmednagar : महसूल विभागातील मुघल, ब्रिटीश कालीन पदांची नावे बदलणार; मंत्री विखेंची माहिती

राज्यात आगामी काळात लोकसभा निवडणुका या पार पडणार आहे. त्यापूर्वी राजकीय पक्षांकडून स्थानिक पातळीवर मोर्चेबांधणी देखील सुरु आहे. इच्छुक उमेदवारांकडून मतदारसंघांमध्ये वावर देखील वाढवला असून नागरिकांच्या गाठीभेटी घेणे सुरु केले आहे. यातच राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके हे लोकसभेसाठी इच्छुक आहेत. लंके हे महायुतीत असून नगर दक्षिणेच्या जागेवर भाजपचा दावा आहे. यामुळे लोकसभेसाठी महायुतीकडून लंके यांना उमेदवारी मिळणार याची शक्यता कमी आहे. लंके यांनी शरद पवार गटात प्रवेश केल्यास त्यांना लोकसभेची उमेदवारी देऊ असे जयंत पाटील यांनी म्हटले होते. आपण लोकसभेच्या अनुषंगाने मतदार संघांमध्ये जनसंपर्क वाढवला असल्याचे लंके यांनी जाहीर केले. यामुळे ते देखील लोकसभेच्या रिंगणात उतरणार हे स्पष्ट आहे.

अजितदादांना बारामतीत डॅमेज केलं तर, आम्ही तुम्हाला कल्याणमध्ये डॅमेज करू


महानाट्यातून लोकसभेची पेरणी

महानाट्याच्या माध्यमातून तब्बल चार दिवस मोठा कार्यक्रम लंके यांनी नगर शहरात घेतला. दक्षिण मतदार संघातील नागरिकांपर्यंत यामाध्यमातून त्यांनी संपर्क साधला. अमोल कोल्हे यांनी देखील लंके यांनी पक्ष प्रवेशाचे निमंत्रण दिले, मात्र शरद पवार यांच्या पत्रकार परिषदेत पवार यांना लंके यांच्या प्रवेशाबाबत विचारण्यात आले असता याबाबत आपल्याला काही माहित नसल्याची गुगली त्यांनी टाकली. माध्यमांमध्ये चर्चा रंगल्याने अखेर लंके यांनी पत्रकार परिषद घेत खुलासा करण्याचे ठरवले. मात्र राजकारणात कधीही काही होऊ शकते असे लंके यांनी स्पष्ट केले.

लंकेच्या चेहऱ्यावर वेगळंच टेन्शन

लंके व शरद पवार यांची भेट झाल्याच्या चर्चा रंगल्या मात्र आपण पवार यांना भेटलो नसल्याचे लंके यांनी स्पष्ट केले. यातच अमोल कोल्हे यांच्याशी लंके यांची भेट झाली मात्र काही राजकीय चर्चा झाली नसल्याचे लंके म्हणाले. मात्र लंके यांच्या पक्ष प्रवेशाबाबत शरद पवारच निर्णय घेतील असे कोल्हे म्हणाले. यामुळे लंके तुतारी फुंकणार या चर्चांना बळ आले. मात्र पत्रकार परिषदेत आपण महायुतीतच आहोत व पक्षाने आदेश दिला तर आपण निवडणूक लढवू असे लंके यांनी स्पष्ट केले. हे सगळं सांगत असताना लंके यांच्या चेहऱ्यावर मात्र टेन्शन हे झळकत होते.

भेटीच्या चर्चा मात्र प्रवेश का लांबला?

राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अजित पवार गटात सहभागी झालेले आमदार निलेश लंके यांचा शरद पवार गटात प्रवेश होणार अशी चर्चा होती. पुण्यात जात लंकेंनी पवारांची भेटही घेतली पण अचानक प्रवेश लांबला अशा चर्चा रंगल्या. पवारांची भेट घेतली नाही मात्र राजकारणात कधी काय होईल हे सांगता येत नाही, असं सूचक विधान निलेश लंके यांनी केले. मात्र हेच निलेश लंके अजितदादांची साथ सोडून शरद पवार यांच्या गटात जाणार यासाठी ते पुण्यात आले होते, अशी चर्चा होती. लंके हे सोमवारी सकाळी पवार यांना भेटले त्यांनतर शरद पवार यांची पत्रकार परिषद देखील झाली. त्यांनतर लंके व कोल्हे यांची भेट झाली व लंके यांचा प्रवेश कधी होणार यावर वेट अँड वोच असे सूचक विधान कोल्हे यांनी केलं. मात्र हे सगळं असले तरी लंके यांचा पक्ष प्रवेश का लांबला याबाबत सस्पेन्स कायम आहे.

प्रतिस्पर्धी कोण यावर उमेदवारी ठरणार

लोकसभेच्या अनुषंगाने भाजपाची लोकसभेची पहिली यादी जाहीर झाली, लवकरच महाराष्ट्राची उमेदवारांची यादी जाहीर होईल. भाजपकडून संभाव्य उमेदवार म्हणून सुजय विखे यांचे नाव चर्चेत आहे. मात्र अद्याप याची अधिकृत घोषणा झाली नाही किंबहुना त्यांची उमेदवारी डळमळीत आहे. दरम्यान प्रतिस्पर्धी उमेदवार जाहीर झाला नसल्याने राष्ट्रवादीकडून देखील आपला उमेदवाराचे पत्ते गुलदस्त्यातच ठेवण्यात आले आहे. भाजपकडून विखेंना उमेदवारी जाहीर झाल्यास लंके हेच शरद पवार गटाचे उमेदवार असतील व त्याचवेळी लंके यांचा राष्ट्रवादीच्या शरद पवार गटात प्रवेश होईल अशा चर्चांना देखील हवा मिळत आहे.

follow us