Sunil Tatkare : महायुतीकडून रायगड लोकसभा (Raigad Loksabha)मतदारसंघातून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे (NCP)प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे हेच मैदानात उतरणार आहेत. आज पुण्यामध्ये राष्ट्रवादीच्या आयोजित पत्रकारपरिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार (Ajit Pawar)यांनी ही घोषणा केली. त्याचवेळी बारामती लोकसभेची जागा देखील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षच लढणार असल्याचा ठराव बैठकीत घेण्यात आला आहे.
“माहित नाही त्याचा हेतू काय होता पण, आमच्यात समेट नाहीच”; मुलाच्या भेटीचं सत्य सिंघानियांनी सांगितलं
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी कॉंग्रेसची पुण्यात एक बैठक पार पडली. त्यात राष्ट्रवादीच्या काही उमेदवारांची घोषणा करण्यात आली. त्यात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी महायुती म्हणून आपण 48 लोकसभा मतदारसंघात उमेदवार देणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेत अजितदादा म्हणाले की, आमचं 99 टक्के जागावाटपाचं काम फायनल झालं आहे. वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी आपले उमेदवार दिले आहेत. आज मी पहिली जागा जाहीर करत आहोत. रायगड लोकसभा मतदार संघातून सुनील तटकरे हे महायुतीचे उमेदवार म्हणून लोकसभा लढवणार आहेत.
शिरुरमध्ये शिवाजीराव अढळराव पाटील यांचा आज राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. त्यांचा पक्षप्रवेश झाल्यानंतर दुसरी जागा जाहीर करणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. बाकी उर्वरीत जागावाटपाचं 28 मार्चला संपूर्ण चित्र स्पष्ट होणार असल्याचंही यावेळी अजित पवार यांनी सांगितले आहे.
या बैठकीनंतर अजित पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. या बैठकीत शिरूर, बारामती, सातारा, धाराशिव, परभणी, नाशिक, रायगड या जागांवर बैठकीत चर्चा झाली असून 6 जागा नक्की झाल्या असून परभणीसंदर्भात येत्या 2 दिवसात अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याचं अजितदादांनी स्पष्ट केलं आहे.
बारामती लोकसभेबाबतही अजितदादांनी उमेदवार बदलणार नसल्याचं जाहीरपणे सांगितलं आहे. बारामतीमध्ये अपक्ष लोकसभा निवडणूक लढवणारे विजय शिवतारे यांच्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे निर्णय घेणार असल्याचंही अजितदादांनी सांगितलं आहे.