“माहित नाही त्याचा हेतू काय होता पण, आमच्यात समेट नाहीच”; मुलाच्या भेटीचं सत्य सिंघानियांनी सांगितलं
Vijaypat Singhania : रेमंड समूहाचे अध्यक्ष गौतम सिंघानिया (Gautam Singhania) आणि त्यांचे वडिल विजयपत सिंघानिया यांचे (Vijaypat Singhania) काही दिवसांपूर्वी एकत्रित फोटो काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या फोटोनंतर पिता-पुत्रातील वाद मिटला असेच अर्थ काढले जाऊ लागले. तशा चर्चाही सुरू झाल्या होत्या. पण, आता खुद्द विजयपत सिंघानिया यांनीच या चर्चा फेटाळून लावल्या आहेत. गौतम सिंघानिया यांच्याशी समेट झाल्याच्या फक्त अफवाच होत्या असे त्यांचे म्हणणे आहे. गौतम सिंघानिया यांच्याबरोबर झालेल्या भेटीच्या आधी आणि भेटीनंतर नेमकं काय घडलं याचा खुलासा विजयपत सिंघानिया यांनी केला आहे. याबाबत इंडिया टुडेने वृत्त दिले आहे.
‘सिंघानियांनी अत्याचार केले, पण अंबानींमुळे वाचलो : नवाज मोदींनी सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
विजयपत सिंघानिया म्हणाले की, 20 मार्च रोजी मुलाच्या सहाय्यकाने फोन केला आणि कॉफीसाठी आमंत्रित केले. तो वारंवार फोन करत होता. पण मी तरीही नकार दिला. त्यानंतर त्याने (गौतम) स्वतः मला फक्त पाच मिनिटे भेटायचं असं सांगितलं. मी अनिच्छेनेच त्याला भेटायला गेलो. मला माहिती नव्हतं की या भेटीमागचा उद्देश मीडियाला मेसेज देण्याचा होता. भेट झाल्यानंतर काही मिनिटांनी मी निघालो आणि विमानतळाकडे रवाना झालो. यानंतर काही वेळातच गौतम आणि माझे एकत्रित फोटो एका मेसेजसह इंटरनेटवर व्हायरल होण्यास सुरुवात झाली. यात असा दावा केला जात होता की गौतम आणि माझ्यात आता समेट झाला आहे. जे धादांत खोटं आहे.
गौतम सिंघानिया यांनी काही दिवसांपूर्वी एक्स अकाउंटवर वडिल विजयपत सिंघानिया यांच्याबरोबर एक फोटो शेअर केला होता. या फोटोच्या कॅप्शनमध्ये, आज वडील घरी आले त्यांचे आशीर्वाद घेऊन मी खूप आनंदी आहे. तुमच्या चांगल्या आरोग्याची कामना करतो असे लिहिले होते. परंतु, हा फोटो आणि त्याखालील शब्द खोटेच असल्याचे सिद्ध झाले आहे. गौतम सिंघानियाचा हा कारनामा त्याच्याच वडिलांनी लोकांसमोर आणला आहे.
Vijaypat Singhania यांनी देशातील प्रत्येक आई-वडिलांना दिलेला संदेश काय बोध देतो ? LetsUpp Marathi
85 वर्षीय विजयपत सिंघानियांनी रेमंड ग्रुपच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत सगळा कारभार मुलाच्या हाती सोपवला. यानंतर मात्र बाप लेकात भांडणे होऊ लागली. हा वाद 2017 मध्ये प्रचंड वाढला होता. यावेळी विजयपत सिंघानिया यांनी दावा केला होता की मुलगा गौतम सिंघानियाने त्यांना घरी राहू दिले नाही. नतंर 2018 मध्ये त्यांनी रेमंडच्या मानद सचिव पदावरून हटवण्यात आले.
गौतम सिंघानियाने भेटीसाठी बोलावण्याच्या त्याच्या हेतूवर संशय घेत विजय सिंघानिया म्हणाले, मला नक्की माहित नाह की त्याचा खरा उद्दे काय होता पण, फक्त कॉफी पिण्यासाठी मला बोलावलं हा तर नक्कीच नव्हता. खरंतर 10 वर्षात मी पहिल्यांदाच जेके हाऊसमध्ये गेलो होतो. आता मला असं वाटतंय की मी पुन्हा तिथे कधीच जाणार नाही.