‘मला रस्त्यावर पाहुन गौतमला आनंद वाटतो’; Gautami Singhania वादात वडिलांची एन्ट्री

‘मला रस्त्यावर पाहुन गौतमला आनंद वाटतो’; Gautami Singhania वादात वडिलांची एन्ट्री

रेमंड (Raymond) या प्रसिद्ध कपड्याच्या ब्रॅंडचे चेअरमन गौतम सिंघानिया (Gautam Singhania) यांनी आपल्या पत्नीपासून विभक्त झाले आहेत. त्यांचं 32 वर्षांचं वैवाहिक आयुष्य यामुळे संपुष्टात आलं आहे. नवाज मोदी सिंघानिया असं त्यांच्या पत्नीचं नाव आहे. सिंघानिया वादात आता वडिल विजयपत सिंघानिया यांची एन्ट्री झाली आहे. मला रस्त्यावर पाहुन गौतमला आनंद वाटत असल्याची प्रतिक्रिया विजयपत सिंघानिया(Vijaypat Singhania) यांनी दिली आहे.

पंकजा मुंडेंना मुख्यमंत्री करण्याचा ते चत्मकार करू शकतात; बच्चू कडूंचा जानकरांना खोचक टोला

विजयपत सिंघानिया म्हणाले, गौतम सिंघानियाला मला रस्त्यावर पाहून आनंद वाटत असेल. 2015 मध्ये त्यांनी रेमंडची धुरा त्यांचा मुलगा गौतमकडे सोपवली होती. आपल्या मुलाला सर्वकाही देऊन मूर्खपणाची चूक केली आहे. गौतम सिंघानिया आणि त्यांची पत्नी नवाज मोदी यांच्या घटस्फोटाच्या मुद्द्यावर विजयपत सिंघानिया यांनी या गोष्टी सांगितल्या आहेत. आपल्या मुलाला सर्वस्व देऊन मोठी चूक केली. जे पालक आपल्या मुलांना सर्व काही देतात त्यांनी प्रथम खूप काळजीपूर्वक विचार केला पाहिजे. सध्या, पत्नी नवाजसोबतच्या वादामुळे प्रसिद्धीझोतात आलेले गौतम सिंघानिया 2017 मध्ये त्यांचे वडील विजयपत सिंघानिया यांना दक्षिण मुंबईतील रेमंड हाऊसमधून हाकलून दिल्याच्या आरोपांमुळे चर्चेत आले होते.

Supriya Sule : खासदारकी रद्द करण्यातून कोल्हेंचं नाव वगळलं पण… सुप्रिया सुळेंनी स्पष्टच सांगितलं

सिंघानिया यांच्या घरी आयोजित दिवाळी पार्टीत नवाजला एंट्री न दिल्याने आता घटस्फोटाबाबत गदारोळ सुरू आहे. गेल्या 13 नोव्हेंबरला गौतम सिंघानिया यांनी सोशल मीडियावर त्यांचे 32 वर्ष जुने नाते संपुष्टात आल्याची घोषणा केली होती. मुलाने कामावरून काढून टाकल्यानंतर मला कोणताही व्यवसाय नाही. गौतमने कंपनीचे काही शेअर्स देण्याचे मान्य केले होते, पण नंतर त्यांनी तेही दिले. मी त्याला सर्व काही दिले, पण चुकून माझ्याकडे काही पैसे शिल्लक राहिले ज्यावर मी जगत होतो. आज मी वाचलो, नाहीतर रस्त्यावर आलो असतो, अशी स्पष्टीकरण विजयपत सिंघानिया यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना दिलं आहे.

दरम्यान, गौतम-नवाज प्रकरणाबाबत ते म्हणाले की, गौतम जर आपल्या वडिलांना हाकलून देऊ शकतो, तर तो आपल्या पत्नीलाही तशाच प्रकारे बाहेर काढू शकतो, अशी खात्री असल्याचंही विजयपत सिंघानिया यांनी स्पष्ट केलं आहे. गौतम सिंघानिया यांना घटस्फोटानंतर त्यांच्या पत्नीला पोटगी म्हणून तब्बल आपली 75 टक्के संपत्ती पत्नीला द्यावी लागणार आहे. यामध्ये तिने तिच्या दोन मुलींसाठी देखील ही संपत्ती मागितलेली आहे. निहारिका आणि निशा या त्यांना दोन मुली आहेत. तर गौकम यांना तब्बल 1.1 बिलियन डॉलर म्हणजे जवळपास 11 हजार कोटींची संपत्ती आहे. ज्यामधून त्यांना तब्बल आपली 75 टक्के संपत्ती पत्नीला द्यावी लागणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube