Ahmednagar Crime : अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून चोरी, हत्या, मारहाणीच्या घटना समोर येत आहे. यामुळे सध्या अहमदनगर जिल्ह्यात नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित होत आहे. यातच आता नेवासा (Nevasa) तालुक्यात आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नेवासा तालुक्यातील देडगाव (Dedgaon) येथून पाथर्डीकडे जात असलेल्या मुळा धरणाच्या कालव्यात एका अज्ञात युवकाच्या शरीराचे आठ ते नऊ तुकडे कुजलेल्या अवस्थेत सापडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. नेवासा पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन कालव्यात विखुरलेले सर्व तुकडे ताब्यात घेतले आहेत. घटनास्थळी बघ्यांची गर्दी जमा झाली होती.
सरपंच चंद्रकांत मुगंसे यांना घटनेची माहिती समजताच त्यांनी पोलीस पाटील प्रल्हाद ससाणे (Police Patil Prahlad Sasane) यांना माहिती दिली. सुरुवातीला कालव्यात हाताचा तुकडा पाण्यात तरंगलेला दिसत होता. पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ व पथकाला घटनास्थळी रवाना केले.
सावधान..! आज अन् उद्या ‘कोसळ’धार; ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी
पंचासमक्ष हाताचा तुकडा काढल्यानंतर पुर्व दिशेला पाय, हात व शरीराचे दोन तुकडे सापडले. तसेच एका गोणीत धड व डोके सापडले. अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कल्लू बर्मे, शेवगाव विभागाचे पोलीस उपअधीक्षक सुनिल पाटील यांनी भेट देऊन तपासाबाबत पथकाला मार्गदर्शन केले. मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात येऊन शासकीय खर्चाने अंत्यविधी करण्यात आला.
काँग्रेस नेते कन्हैया कुमारांना मारहाण, शाईही फेकली, जाणून घ्या नेमकं घडलं काय ?