सावधान..! आज अन् उद्या ‘कोसळ’धार; ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी

सावधान..! आज अन् उद्या ‘कोसळ’धार; ‘या’ जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी

Weather Update in Maharashtra : राज्यात कडाक्याच्या उन्हाळ्यात अवकाळी पावसाचे थैमान (Weather Update) सुरुच आहे. राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस होत आहे. या पावसामुळे वातावरणातील उष्णता कमी झाली आहे. मात्र फळबागांना मोठा फटका बसला आहे. उन्हाळ्यातील काही दिवसांचा अपवाद वगळला तर पाऊस होतच आहे. आताही काही दिवस पावसाचा मुक्काम राहणार आहे. आज शनिवार आणि रविवार या दोन दिवसांत जोरदार पाऊस होईल असा इशारा देण्यात आला आहे.

भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज शनिवारी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात वाऱ्यासह जोरदार पाऊस होईल. यासोबतच गारपीट होण्याची शक्यता देखील आहे. या पार्श्वभुमीवर काही जिल्ह्यांना आरेंज आणि यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या काळात शेतकऱ्यांनी पिकांची काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

Maharashtra Weather Update : राज्यात पुढील दोन दिवस उष्णतेचे, काही ठिकाणी पावसाचीही शक्यता

या जिल्ह्यांना यलो अन् ऑरेंज अलर्ट

हवामान विभागाने पुणे, नगर, सातारा, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, बीड, जळगाव या जिल्ह्यांत अवकाळी पाऊस होईल असा अंदाज व्यक्त केला आहे. या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. सोलापूर, सांगली, नांदेड, जालना, अकोला, अमरावती, यवतमाळ या जिल्ह्यात आज आणि उद्या या दोन दिवसांत तुफान पाऊस होईल असा अंदाज आहे. हवामान विभागाने या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे.

मे महिन्याच्या अखेरीस मान्सून केरळमध्ये (Kerala) दाखल होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने (IMD) वर्तवली आहे. मागील वर्षी देशात 8 जून रोजी मान्सूनची एंट्री झाली होती. मात्र यावर्षी दक्षिण अंदमानच्या समुद्रात 19 मे रोजी मान्सून दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. यामुळे यंदा मान्सून लवकरच केरळमध्ये दाखल होणार आहे.

त्याचबरोबर एल निनो कमजोर होत असल्याने देशात यंदा चांगला पाऊस होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. तर आता भारतीय हवामान विभागाने केरळमध्ये मान्सूनच्या आगमनाची तारीख जाहीर केली आहे. महाराष्ट्रात देखील यावेळी मान्सून चांगला राहणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

Weather Forecast : मध्य महाराष्ट्र, मराठवाडा विदर्भात गारपिटीचा इशारा, ‘या’ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज