रोटरी लिटरसी दिनानिमित्त २० आदर्श शिक्षकांना रोटरी तर्फे राष्ट्र निर्माता पुरस्कार जाहीर

  • Written By: Published:
रोटरी लिटरसी दिनानिमित्त २० आदर्श शिक्षकांना रोटरी तर्फे राष्ट्र निर्माता पुरस्कार जाहीर

नगर : रोटरी लिटरसी दिनानिमित्त रोटरी क्लब ऑफ अहमदनगरचे मेन, सेंट्रल, इंटेग्रीटी व डिग्निटी क्लब्सच्या वतीने आदर्श शिक्षकांना दिला जाणारा नेशन बिल्डर्स अवार्ड (राष्ट्र निर्माता पुरस्कार २०२३) हा पुरस्कार वितरण सोहळा शुक्रवारी (8 सप्टेंबर) अहमदनगर क्लब येथे सकाळी दहा वाजता होणार आहे.

जिल्हा ३१३२ च्या डिस्ट्रिक्ट गवर्नर स्वाती हेरकल यांच्या अध्यक्षतेखाली अहमदनगरचे शिक्षणाधिकारी अशोक कडूस व माजी शिक्षण संचालक श्री दिनकर टेमकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा होणार आहे. रोटरी वर्ष २०२३-२०२४ या वर्षासाठी जिल्ह्यातील २० आदर्श शिक्षकांना नेशन बिल्डर्स अवॉर्ड (राष्ट्र निर्माता पुरस्कार २०२३) हा पुरस्कार जाहीर झाला आहे. पुरस्कारार्थी निवडण्यासाठी झालेल्या बैठकीला रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३२ चे लिटरेसी डायरेक्टर दादासाहेब करंजुले, यूथ सर्व्हिसेस डिस्ट्रिक्ट डायरेक्टर ईश्वर बोरा तसेच चारही रोटरी क्लबचे अध्यक्ष माधव देशमुख, हरीश नय्यर, चंदना गांधी, डॉ. प्रसन्न देवचके, दीपक गुजराथी, डॉ. कुणाल कोल्हे, शुभश्री पटनाईक, उज्ज्वला राजे तथा प्रत्येक क्लबचे लिटरेसी चेअर यांच्या उपस्थितीत बैठक झाली.

आदर्श शिक्षकांना दिल्या जाणाऱ्या नेशन बिल्डर्स अवॉर्ड पुरस्कारांमध्ये रोटरी क्लब ऑफ अहमदनगर मेनच्या वतीने वैभव सुरेशराव पठारे (जि. प. प्राथमिक शाळा पाडळी रांजणगाव ता. पारनेर), मंगला बाळासाहेब झावरे (जि. प. प्राथमिक शाळा यादववाडी ता. पारनेर), सुवर्णा सुरेश पवार (जि. प. सेमी इंग्लिश स्कूल जांभुळवाडी (सुपा) ता. पारनेर), जयश्री राहुल देशपांडे (केशवराव गाडीलकर हायस्कूल ,अहमदनगर), सविता श्रीधर तवले (जि. प. शाळा पिंपळगाव वाघा ता. नगर), रोटरी क्लब ऑफ अहमदनगर सेंट्रल च्या वतीने राजळे एस. डी. (शाहीर अण्णाभाऊ साठे प्राथमिक शाळा नंबर 23, अहमदनगर), पोतदार व्ही. एम. (हिंद सेवा मंडळाचे प्राथमिक शाळा अहमदनगर), रघुनाथ सोपन वाघ (जि. प. प्राथमिक शाळा रास्तापुर ता. नेवासा), लोणकर एन ए (स्वातंत्र्यसेनानी जानकीबाई कवडे प्रशाला भिंगार, अहमदनगर), झिने मंगला रघुनाथ (दुर्गादेवी अमरचंद नय्यर विद्यामंदिर, अहमदनगर), रोटरी इंटिग्रिटी क्लब च्या वतीने मुरकुटे रत्‍नाबाई कारभारी (जि. प. शाळा घोडेगाव, ता. नेवासा), वावरे स्मिता दिनकर (जि. प. प्राथमिक शाळा बहिरवाडी, ता. नगर), पुंडे प्रियंका प्रशांत (मनपा स्कूल नंबर 17, अहमदनगर), म्हस्के सुदाम नामदेव (श्री अंबिका विद्यालय देवी भोयरे ,ता. पारनेर), श्री. चौधरी सुदाम साहेबराव (जानकीबाई आपटे मूकबधिर विद्यालय, अहमदनगर), रोटरी क्लब ऑफ अहमदनगर डिग्निटी च्या वतीने अभिषेक अर्जुन घटमाळ (जि. प. प्राथमिक शाळा नवे देडगाव, ता. नेवासा), बाळासाहेब भाऊसाहेब कड
(जि.प.प्रा.शाळा शिवाजीनगर (नेप्ती ) कल्याण रोड, अहमदनगर), सौ. संगीता विजय कदम (जि. प. प्राथमिक शाळा अरणगाव, ता. नगर).

भाऊसाहेब विठ्ठल फंड (जि. प. प्राथमिक शाळा, शिंगवे नाईक ता. नगर), श्री.सचिन रामकृष्ण बागल (जि. प. प्राथमिक शाळा, पिंपरी घुमट, ता. नगर) या सर्व आदर्श शिक्षकांचा समावेश आहे. त्यांना सर्व रोटरी क्लब च्या सभासदांच्या उपस्थितीत शाल श्रीफळ, सन्मानचिन्ह व मानपत्र देऊन सन्माननित व गौरविण्यात येणार आहे, अशी माहिती रोटरी क्लब ऑफ अहमदनगर सेंट्रलचे पब्लिक इमेज डायरेक्टर ईश्वर बोरा यांनी दिली.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube