Ahmednagar Lok Sabha Election : यंदा अहमदनगर – शिर्डीमध्ये कमी मतदान, फटका कोणाला?

Ahmednagar Lok Sabha Election : यंदा अहमदनगर – शिर्डीमध्ये कमी मतदान, फटका कोणाला?

Ahmednagar Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) चौथ्या टप्प्यात आज अहमदनगर, शिर्डी मतदारसंघासह 11 लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडले आहे. आज 13 मे रोजी अहमदनगर (Ahmednagar Lok Sabha) आणि शिर्डी लोकसभा (Shirdi Lok Sabha) मतदारसंघात मतदान सुरळीतपणे पार पडले. यावेळी अहमदनगर लोकसभा मतदारसंघात अंदाजे सरासरी एकूण 61 टक्के आणि शिर्डी लोकसभा मतदार संघात अंदाजे सरासरी 62 टक्के मतदान झाल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सिद्धाराम सालीमठ (Siddharam Salimath) यांनी दिली.

2019 च्या लोकसभा निवडणुकीत अहमदनगर लोकसभा मतदारसंघात 64.86 टक्के तर शिर्डी लोकसभा मतदारसंघात 64.67 टक्के मतदान पार पडले होते. यामुळे अहमदनगर आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघात कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे.

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकी दरम्यान अहमदनगर येथे किरकोळ वादातून राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला तर  शेवगाव तालुक्यातील भातकुडगाव येथे मतदाराने ईव्हीएमवरील मतदानाचे चित्रीकरण केल्याने संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात आला तर राहाता तालुक्यातील कोल्हार येथे निळया रंगाच्या शाईची बाटली घेऊन अवैधरित्या शाई लावणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किरकोळ घटना वगळता अहमदनगर जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीसाठीचे मतदान शांततेत पार पडले असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिली.

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत 8 जणांचा मृत्यू! अजूनही लोक अडकले

अहमदनगर लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार सुजय विखे (Sujay Vikhe) आणि महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके (Nilesh lanke) यांच्या मुख्य लढत पाहायला मिळाली तर शिर्डी लोकसभा मतदारसंघात भाऊसाहेब वाकचौरे (Bhausaheb Vakchaure), सदाशिव लोखंडे (Sadashiv Lokhande) आणि उत्कर्षा रूपवते (Utkarsha Rupwate) यांच्यात तिरंगी लढत पाहायला मिळाली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज