Download App

बिश्नोई गँगच्या सदस्याला यवतमाळ गुन्हे शाखेकडून अटक, कोण आहे हा?, कसा आला महाराष्ट्रात?

यवतमाळ जिल्हा पोलीस अधिक्षक कुमार चिंता यांच्या आदेशानुसार शहरात अंमली पदार्थांविरोधात कारवाई सुरू असताना, पोलिसांना

Bishnoi Gang Member Bhinda Arrested In Yavatmal : यवतमाळ जिल्ह्यातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथून कुख्यात लॉरेन्स बिश्नोई गँग आणि बिन्नी गुज्जर टोळीचा सक्रिय सदस्य असलेला आणि राजस्थान (Bishnoi) पोलिसांच्या मोस्ट वाँटेड यादीत असलेला भुपेंद्र सिंग ऊर्फ रघु ऊर्फ भिंडा याला यवतमाळ स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली आहे.

यवतमाळ जिल्ह्यात अंमली पदार्थ विरोधी मोहिम राबवण्यात आली. त्यामध्ये ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. बिश्नोई गुज्जर गैंगचा कुख्यात असलेल्या एका फरार सुपारी किलर भिंडा याला यवतमाळ पोलिसांनी शनिवारी मोठ्या शिताफीने जाळ्यात घेतले. भूपेंद्र सिंग उर्फ भिंडा उर्फ रघुवीर (35 वर्षे) रा.अहारना खुर्द, पो.मेहटीयाना, होशियारपूर (पंजाब) असे आरोपीचे नाव आहे.

लॉरेन्स बिश्नोई आणि बित्री गुज्जर टोळीशी संबंधित असलेला हा आरोपी गेल्या काही वर्षांपासून विविध राज्यांतील खून, खंडणी व आर्म ॲक्टसारख्या गुन्ह्यांमध्ये फरार होता. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी त्याला शहरातील दांडेकर लेआऊट येथून जेरबंद केले, अशी माहिती पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

आधी बिश्नोई गॅंगकडून धमकी, आता सलमान खानच्या इमारतीत घुसखोरी, संशयीताला घेतले ताब्यात

यवतमाळ जिल्हा पोलीस अधिक्षक कुमार चिंता यांच्या आदेशानुसार शहरात अंमली पदार्थांविरोधात कारवाई सुरू असताना, पोलिसांना खात्रीशीर गोपनीय माहिती मिळाली की, पंजाबमधील होशियारपूर जिल्ह्यातील रहिवासी आणि खुनासारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये फरार असलेला भुपेंद्र सिंग ऊर्फ भिंडा यवतमाळच्या जांब रोड परिसरात खोटी ओळख लपवून राहत आहे. त्यानंतर पोलिसांनी छापा टाकला. भिंडाने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्याला पकडले आणि राजस्थान पोलिसांच्या ताब्यात दिले असं अधिक्षक चिंता म्हणाले.

सुमारे २० गुन्हे दाखल

पोलीस तपासात भिंडाविरुद्ध पंजाब व राजस्थानमध्ये खून, खूनाचा प्रयत्न, खंडणी, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे यासारखे २० पेक्षा अधिक गंभीर गुन्हे दाखल असल्याचं निष्पन्न झालं. विशेष म्हणजे २०२३ मध्ये बाडमेर (राजस्थान) येथे झालेल्या सुपारी घेऊन झालेल्या खून प्रकरणात तो मुख्य आरोपी आहे. भिंडा याने हरपालसिंग उर्फ रिंकूचा खून केल्यानंतर तो फरार झाला होता.

अमेरिकेतून डॉलरमध्ये पैसे

आरोपीची कसून चौकशी केली असता त्याने सांगितलं की, अमेरिकेतील सौरव गुज्जर (बिल्लू गुज्जरचा भाऊ व गोल्डी ब्रार याचा निकटवर्तीय) हा गेल्या तीन वर्षांपासून भिंडाला डॉलरमध्ये पैसे पाठवायचा. त्या पैशांतून हा गुन्हेगार फरार असताना राहणीमान, शस्त्र व पुढील गुन्ह्यांसाठी तयारी ठेवण्यासाठी आर्थिक आधार दिला जात असल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे.

 

follow us