मोठी बातमी! सलमान खानच्या सुरक्षेत वाढ, गॅलक्सी अपार्टमेंटला लावल्या बुलेटप्रुफ काचा

मोठी बातमी! सलमान खानच्या सुरक्षेत वाढ, गॅलक्सी अपार्टमेंटला लावल्या बुलेटप्रुफ काचा

Salman Khan Galaxy Apartment Become Waterproof : अभिनेता सलमान खानसंदर्भात एक मोठी बातमी समोर आलीय. लॉरेन्स बिश्नोईच्या धमकीनंतर अभिनेता सलमान खानने (Salman Khan) सुरक्षा व्यवस्था लक्षात घेऊन गॅलेक्सी अपार्टमेंटच्या (Galaxy Apartment) बाल्कनीमध्ये बदल केले आहेत. सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर सलमानच्या गॅलक्सी अपार्टमेंटला बुलेटप्रुफ काच लावण्यात आलीय. गॅलेक्सी अपार्टमेंटच्या बाल्कनीची नवीन फोटो समोर आलेत. ज्यात बुलेट प्रूफ काच लावलेली दिसत आहे.

महिलेच्या गजब ऑर्डरमुळं ब्लिंकिट, झेप्टो अन् स्विगीची पळापळ; शर्यतीत कुणी पटकावला नंबर

सलमान खानला गेल्या काही महिन्यांपासून लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून मिळणाऱ्या धमक्यांमध्ये त्याच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिले जात आहे. सलमान खानच्या घराच्या बाल्कनीमध्ये सुरक्षा वाढवण्यात आल्याचे दिसत (Salman Khan News) आहे. बाल्कनी बुलेटप्रूफ काचेने संरक्षित आहे. बाल्कनी चारही बाजूंनी निळ्या बुलेटप्रूफ काचेने झाकलेली दिसते. सलमान खान आणि बिश्नोई गॅंगमधील वाद खूप जुना आहे. सलमान खानला जिवे मारण्याचा देखील प्रयत्न झाला होता. त्यामुळे सलमान खानच्या गॅलक्सी अपार्टमेंट बाहेर तगडा बंदोबस्त दिसत आहे.

सलमानच्या वांद्रे येथील गॅलक्सी अपार्टमेंट बाहेर 2024 च्या एप्रिल महिन्यामध्ये गोळीबार झाला होता. त्यानंतर सलमान खानची सुरक्षा वाढवली. गॅलक्सी अपार्टमेंटला तगडा बंदोबस्त करण्यात येतोय.

महायुतीत मनसेची एन्ट्री शिंदेंच्या आडमुठ भूमिकेमुळे फिस्कटली; कार्यकर्त्यांचं ठाकरेंसमोर खळ्ळखट्याक

सलमान खान नुकताच गुजरातमधील जामनगर येथे होता. तिने त्याने अंबानी कुटुंबीयांच्या घरी मित्र आणि कुटुंबियांसमवेत त्याचा 59 वा वाढदिवस भव्य पद्धतीने साजरा केला. बिश्नोई गॅंगसोबत असलेल्या वादाचा परिणाम कामावर होणार नाही, याची काळजी घेताना सलमान दिसत आहे. सलमान रश्मिका मंदान्नासोबत त्याचा आगामी चित्रपट सिकंदरचे अंतिम शूटिंग सुरू करण्यासाठी सज्ज झाला आहे. शेवटचे वेळापत्रक 10 जानेवारी रोजी मुंबईत सुरू होणार आहे. सिकंदर 2025 च्या ईदला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

सिकंदरच्या अधिकृत टीझरने प्रेक्षकांमध्ये खूप उत्साह निर्माण केला आहे. दबंगचे चाहते सिकंदरशी संबंधित अपडेट्सची आतुरतेने वाट पाहत आहेत. यामध्ये सलमान ॲक्शनपॅक अवतारात दिसणार आहे. सलमानशिवाय सिकंदरमध्ये सत्यराज, प्रतीक बब्बर, काजल अग्रवाल आणि शर्मन जोशी यांचाही समावेश आहे. सिकंदर हा साजिद नाडियादवाला प्रस्तुत आणि ए.आर. मुरुगदास दिग्दर्शित चित्रपट आहे.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube