Anti-Corruption Bureau : काही दिवसांपूर्वी अहमदनगर महापालिकेच्या (Ahmednagar Municipal Corporation) आयुक्त डॉ. पंकज जावळे (Pankaj Jawle) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून (Anti-Corruption Bureau) कारवाई करण्यात आली होती. अहमदनगर महानगरपालिकेचे आयुक्त पंकज जावळे यांनी शहरातील एका बिल्डरला बांधकाम परवानगी देण्यासाठी तब्बल आठ लाखांची लाच मागितल्या प्रकरणी कारवाई करण्यात आली होती. सध्या या प्रकरणात आयुक्त डॉ. पंकज जावळे फरार आहे.
तर दुसरीकडे पुन्हा एकदा अहमदनगर शहरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत तलाठी आणि महीला मंडलाधिकारीवर कारवाई केली आहे. अहमदनगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून ही कारवाई करण्यात आली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, सागर एकनाथ भापकर (तलाठी, सावेडी, अहमदनगर) आणि शैलजा राजाभाऊ देवकाते (मंडलाधिकारी,सावेडी, अहमदनगर) यांनी 22 प्लॉटच्या फेरफार नोंदी ऑनलाइन अपलोड करण्यासाठी 44 हजार रुपयांची लाच मागितली होती आणि तडजोडी अंती 40 हजार रुपये लाच रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शविल्या प्रकरणी अहमदनगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून ही कारवाई करण्यात आली आहे.
माहितीनुसार तक्रारदार व त्यांचे नातेवाईक यांच्या संयुक्त नावाने शहरातील सावेडी भागात 18000 चौरस फूटचा प्लॉट आहे. या प्लॉटचे अहमदनगर महानगरपालिका यांचे कडील शासकीय रेखांकन करून सदर प्लॉटचे बांधकाम करण्याकरीता 22 स्वतंत्र उपविभागनी केलेली आहे. मात्र लोकसेवक भापकर (तलाठी, सावेडी) यांनी पंचा समक्ष तक्रारदार यांच्याकडे त्यांच्या 22 प्लॉटच्या फेरफार नोंदी ऑनलाइन अपलोड केल्याच्या मोबदल्यात 44 हजार रुपये लाचेची मागणी करून तडजोडी अंती 40 हजार रुपये लाच रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शवली आणि लोकसेविका देवकाते यांनी तक्रारदार यांच्याकडून सदर प्लॉटच्या फेरफार नोंदी मंजूर करण्यासाठी 44 हजार रुपये लाच रक्कम स्वीकारल्याचे मान्य केले.
Pune Rain Alert: पावसाचा हाहाकार! 5 जणांचा मृत्यू, जाणून घ्या ताजे अपडेट
लोकसेवक भापकर, तलाठी यांच्यासाठी प्रत्येकी पाचशे रुपये प्रमाणे 22 प्लॉटचे 11 हजार रुपये लाचेची मागणी त्यांनी केली होती. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कारवाई सुरु करण्यात आली आहे.