Download App

कॅप्टन सुमित नोकरी सोडणार होते पण…, आमदार दिलीप लांडेंचा मोठा गौप्यस्फोट

Dilip Mama Lande On Ahmedabad Plane Crash :  गुजरातच्या अहमदाबाद येथे गुरूवारी 12 जून रोजी लंडनला जाणारे एअर इंडियाचं (Air India) विमान

  • Written By: Last Updated:

Dilip Mama Lande On Ahmedabad Plane Crash :  गुजरातच्या अहमदाबाद येथे गुरूवारी 12 जून रोजी लंडनला जाणारे एअर इंडियाचं (Air India) विमान कोसळल्याने (Ahmedabad Plane Crash) गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी (Vijay Rupani) यांच्यासह 265 जणांचा मृत्यू झाला आहे. यात या विमानाचे कॅप्टन सुमित सभरवाल (Sumit Sabharwal) यांचा देखील समावेश आहे. मात्र कॅप्टन सुमित सभरवाल लंडनला जाऊन आल्यानंतर नोकरी सोडणार होते अशी माहिती चांदिवली विधानसभाचे आमदार दिलीप मामा लांडे (Dilip Mama Lande) यांनी दिली आहे. कॅप्टन सुमित सभरवाल पवईतील जलवायू विहारमध्ये राहत होते. त्यांना 8,200 तासांचा उड्डाणाचा अनुभव होता.

माध्यमांशी बोलताना आमदार दिलीप लांडे यांनी सांगितले की, कॅप्टन सुमित यांचे वडील 88 वर्षांचे आहे. त्यामुळे त्यांची सेवा करण्यासाठी सुमित सभरवाल यांनी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला होता. ते लंडनला जाऊन आल्यानंतर नोकरी सोडणार होते. असं माध्यमांशी बोलताना आमदार दिलीप लांडे म्हणाले. आमदार लांडे यांनी विमान अपघातानंतर कॅप्टन सुमित यांच्या घरी जाऊन त्यांच्या वडिलांची सांत्वन भेट घेतली होती. कॅप्टन सुमित यांच्या आईचे देखील दोन वर्षांपूर्वी निधन झाले असल्याची माहिती देखील माध्यमांशी बोलताना आमदार लांडे यांनी दिली.

तसेच माझ्या विधानसभा मतदारसंघात छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ आहे. या विमानतळाच्या शेजारी मोठ्या प्रमाणात झोपडपट्ट्या वसलेल्या आहे. त्यामुळे जर भविष्यात अहमदाबादप्रमाणे अशी दुर्घटना घडली तर मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतो त्यामुळे या ठिकाणी वसलेल्या लोकांना दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करण्यात यावा अशी मागणी केंद्र आणि राज्य सरकारकडे केली आहे.

265 जणांचा जीव गेल्यानंतर DGCA ला आली जाग; बोईंगच्या सर्व विमानांची होणार तपासणी

गुरुवार 12 जून रोजी दुपारी लंडनला जाणारे एअर इंडियाचे प्रवाशी विमान एम जे मेडिकल कॉलेजवर कोसळल्याने 265 जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातामध्ये महाराष्ट्रातील 6 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे.

follow us