265 जणांचा जीव गेल्यानंतर DGCA ला आली जाग; बोईंगच्या सर्व विमानांची होणार तपासणी

Ahmedabad Plane Crash : गुजरातच्या अहमदाबाद येथे गुरूवारी 12 जून रोजी लंडनला जाणारे एअर इंडियाचं विमान कोसळल्याने (Ahmedabad Plane Crash) गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी (Vijay Rupani) यांच्यासह 265 जणांचा मृत्यू झाला आहे. बोईंग (Boeing) कंपनीचा विमान गुरुवार दुपारी 1. 38 च्या सुमारास बीजे मेडिकल कॉलेजवर (BJ Medical College) कोसळला. विमान कोसळला तेव्हा या विमानात 12 क्रू मेंबर्ससह 242 प्रवाशी होते. या अपघातानंतर बोईंग कंपनीवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. तर दुसरीकडे उड्डयन महासंचालनालयाने (DGCA) देखील मोठा निर्णय घेत आता बोईंगच्या सर्व विमानांची तपासणी करण्याचे आदेश दिले आहे.
DGCA ने एअर इंडियाला 15 जून 2025 च्या मध्यरात्री (00:00 वाजता) पासून भारतातून उड्डाण करण्यापूर्वी एक वेळची विशेष तपासणी प्रक्रिया अनिवार्यपणे लागू करण्याचे आदेश दिले असल्याची माहिती DGCA कडून देण्यात आली आहे. DGCA ने आता उड्डाणापूर्वी अनेक महत्त्वाच्या तांत्रिक तपासणीचे आदेश दिले आहे. ज्यात इंधन पॅरामीटर मॉनिटरिंग, केबिन एअर कॉम्प्रेसर सिस्टम, इलेक्ट्रॉनिक इंजिन नियंत्रण चाचणी, इंजिन इंधन अॅक्च्युएटर ऑपरेशन, ऑइल सिस्टम आणि हायड्रॉलिक सिस्टमची सेवा तपासणी यांचा समावेश आहे. याच बरोबर DGCA ने ट्रान्झिट तपासणीमध्ये ‘फ्लाइट कंट्रोल इन्स्पेक्शन’ जोडण्याचे आदेश दिले आहे आणि ही प्रक्रिया पुढील आदेशापर्यंत सुरु ठेवण्यात येणार असल्याची माहिती देखील DGCA ने दिली आहे.
DGCA (Directorate General of Civil Aviation) orders enhanced safety inspection on Boeing 787-8/9 fleet of Air India pic.twitter.com/bj62WbWc9O
— ANI (@ANI) June 13, 2025
शनिशिंगणापूर देवस्थान! हिंदुत्ववादी संघटनांचा इशारा…, मुस्लिम कर्मचाऱ्यांची कामावरून हकालपट्टी
तर दुसरीकडे दोन आठवड्यांच्या आत पॉवर अॅश्युरन्स चेक करणे देखील बंधनकारक करण्यात आले आहे. यासोबतच, गेल्या 15 दिवसांत बोईंग ड्रीमलाइनर विमानांमध्ये वारंवार येणाऱ्या तांत्रिक बिघाडांचा (स्नॅग्ज) आढावा घेण्याचे आणि त्यांच्याशी संबंधित सर्व देखभालीचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश DGCA कडून देण्यात आले आहे.