Download App

राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम? शरद पवारांच्या खळबळजनक आरोपांवर… CM फडणवीसांनी दिलं उत्तर

CM Devendra Fadnavis Criticized Sharad Pawar : आजपर्यंत राहुल गांधी यांनी (Rahul Gandhi) ईव्हीएम मशीनबाबत अनेकदा शंका उपस्थित केल्या, तरी शरद पवार (Sharad Pawar) यांनी कधीही असे वक्तव्य केलेले नव्हते. उलट, पवारांनी अनेकदा स्पष्टपणे सांगितले (Election Voting Scam) आहे की, ईव्हीएमवर आरोप करणे चुकीचे आहे. मात्र, राहुल गांधींच्या भेटीनंतरच शरद पवार मतदान प्रक्रियेत बदलाबाबत अचानक बोलू लागले आहेत. हे राहुल गांधी यांच्याशी झालेल्या भेटीमुळेच झाले आहे, अशी टिप्पणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी (Devendra Fadnavis) शनिवारी मुंबईत पत्रकारांशी बोलताना केली.

मोठी बातमी, बाबा सिद्धीकी हत्या प्रकरण संशयित आरोपीला नेपाळमधून अटक

देवेंद्र फडणवीसांचा सवाल

मला एक गोष्ट लक्षात येत नाही, इतक्या दिवसांनी पवार साहेबांनी राहुल गांधी यांना भेटल्यानंतरच या सगळ्याची आठवण का आली? इतके दिवस शरद पवार काहीही बोलले नाहीतच आज अचानक बोलले. राहुल गांधी ज्याप्रमाणे सलीम जावेदच्या कहाण्या तयार करुन त्यांच्या स्क्रिप्टवर रोज कपोलकल्पित कहाण्या सांगत आहेत, तशाच प्रकारची अवस्था पवार साहेबांची झाली नाही ना? ज्याप्रमाणे शरद पवार बोलले, तो राहुल गांधी यांच्या भेटीचा परिणाम दिसतोय, असं देखील मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केलंय.

मी एकनाथ शिंदेंचा पीए, नोकरी देतो… सांगत 55 लाखांचा गंडा! जळगावात ठगांची फिल्मी स्टाईल लूट

नेमकं काय घडलं?

शरद पवार यांनी नुकत्याच एका पत्रकार परिषदेत सांगितले की, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या आधी दिल्लीत दोन लोक त्यांना भेटायला आले होते. त्यांनी 160 मतदारसंघांमध्ये हमखास विजय मिळवून देण्याचे आश्वासन दिले, पण त्यांनी पारदर्शक निवडणूक प्रक्रियेला प्राधान्य दिले, असे पवारांनी म्हटले. त्यांच्या या विधानामुळे महाराष्ट्रातील राजकारणात खळबळ उडाली होती.

शपथांची न्यायालयात काय किंमत?

याच पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांच्या आरोपांचे खंडन करत म्हटले की, विरोधक कितीही भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करोत, पण भारतात इतक्या पारदर्शक आणि स्वच्छ निवडणुकाही नाहीत. ईव्हीएम आणि निवडणूक आयोगावर आरोप करणारे लोक जनतेमध्ये बोलतात, पण आयोगाकडे बोलावले की तिकडे येत नाहीत, शपथपत्र भरण्याला तयार नसतात. ते सांगतात की, संसदेत शपथ घेतली आहे, पण त्यांच्या शपथांची न्यायालयात काय किंमत आहे? त्यांना माहिती आहे की खोटं पकडलं तर फौजदारी कारवाई होऊ शकते. त्यामुळे रोज खोटं बोलून पळून जाणार्‍या या लोकांना फडणवीस यांनी ‘पळपुटे’ अशी नावं दिली.

 

follow us