Download App

VIDEO : कृषीमंत्र्यांना बागायती गावाचीच पाटीलकी हवी! माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा सत्ताधाऱ्यांना टोला

Congress Leader Balasaheb Thorat Interview : कॉंग्रेसचे (Congress) ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी लेट्सअप सभा या विशेष कार्यक्रमात खास मुलाखत दिली. यावेळी त्यांनी अनेक गौप्यस्फोट केले आहेत. शिर्डी मतदारसंघात वाढलेले मतदार, (Balasaheb Thorat Interview), कृषीखात्यावर देखील भाष्य केलंय.

कॉंग्रेस नेते राहुल गांधी सातत्याने मतदार यादीत घोळ झाल्याचा आरोप करीत आहेत. यावर बोलताना थोरात यांनी म्हटलंय की, निवडणूक आयोगाने डिजीटल यादी का दिली नाही? शिर्डीच्या निकालावर बोलताना त्यांनी म्हटलंय की, वाढ दाखवली ती तपासून घ्यावी. ही वस्तुस्थिती आहे, हे देशामध्ये लागू आहे. एका मतदारसंघात लाखाने मतदान वाढवलं. एका बापाला 50-60 मुलं दाखवली.

शरद पवारांना मोठा धक्का; माजी आमदार अजित पवारांच्या पक्षात करणार प्रवेश

कृषी खातं ओसाड गावची पाटीलकी?

कृषी खातं (Agriculture Minister) खरंच ओसाड गावची पाटीलकी आहे का? असं विचारल्यानंतर कृषीखात्यावर बोलताना थोरात यांनी म्हटलंय की, 2004 ला मी कृषीमंत्री झालो होतो. मी स्वत: शेतकरी आहे, कृषीमंत्री व्हावं हे माझं स्वप्न होतं. मी सहा वर्ष कृषीमंत्री होतो. तो कृषीखात्याचा सुवर्णकाळ होता. मी खरं बोलत आहे. मनापासून काम केलं होतं. ओसाड गाव की बागायत गाव, कसं ठरवलं जातं? हा भाग वेगळा आहे.

शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरू असताना मी कृषीमंत्री होतो. त्या सहा जिल्ह्यांत मी दोन-तीन दिवस असायचो. आजच्या विद्यापीठांत सत्तर टक्के स्टाफ नाही. यापेक्षा वाईट परिस्थिती काय असेल? कृषीमंत्र्यांना बागायती गावाची पाटीलकी हवी असते, असा देखील टोला बाळासाहेब थोरात यांनी लगावला आहे.

हा तर कॉमन सेन्स, जेलमध्ये जाणाऱ्यांची खूर्ची जाणं योग्यचं; काँग्रेसमध्ये राहून थरूर मोदींच्या बाजूने

दुर्दैवाने गुणवत्ता खालावली

यंदा पावसाळी अधिवेशनात प्रचंड राडा झाला. आमदारांची भांडणं, आरोप-प्रत्यारोप अशा अनेक घटना घडल्या. यावर बोलताना बाळासाहेब थोरात यांनी म्हटलंय की, सभागृह हे एक व्यासपीठ आहे. त्याची गुणवत्ता असली पाहिजे. एकमेकांवर आरोप करणं, आजच्या दुर्दैवाने गुणवत्ता खालावली आहे. विधानसभा निवडणुकीवेळी भाजप नेते सुजय विखे पाटील यांच्या सभेत वसंतराव देशमुख यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. यावर बोलताना ते म्हणाले की, आपल्याही मुली राजकारणात असतात. आपण बोलताना काही संयम पाळला पाहिजे. वयोवृद्ध व्यक्तीने खालच्या पातळीवर जावून बोलणं योग्य नाही. ते कायम निषेधार्हच राहणार, असं देखील त्यांनी स्पष्ट केलंय.

शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरू असताना मी कृषीमंत्री होतो. त्या सहा जिल्ह्यांत मी दोन-तीन दिवस असायचो. आजच्या विद्यापीठांत सत्तर टक्के स्टाफ नाही. यापेक्षा वाईट परिस्थिती काय असेल? कृषीमंत्र्यांना बागायती गावाची पाटीलकी हवी असते, असा देखील टोला बाळासाहबे थोरात यांनी लगावला आहे.

follow us