Download App

पवारांसाठी राऊतांची धावाधाव; डबल गेम नव्हे तर, फडणवीसांचा प्रयोग फसला

  • Written By: Last Updated:

Sanjay Raut Attack On Devendra Fadanvis : पहाटेच्या शपथविधीबाबत फडणवीसांनी रिपब्लिक भारतला दिलेल्या मुलाखतीत अनेक गौप्यस्फोट केले आहेत. त्यांच्या या खुलाशांनंतर आता राजकीय वातावरण तापण्यास सुरूवात झाली आहे. मुलाखतीत फडणवीसांनी शरद पवारांनी डबल गेम खेळली या विधानावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पवारांची बाजू घेत फडणवीसांवर पलटवार केला आहे. ते म्हणणाले की, पवारांनी डबल गेम खेळला नसून, फडणवीसांनी केलेला प्रयोग फसला आहे. फडणवीसांकडे कोणताही नवीन मुद्दा नाही. त्यामुळे ते असे खुलासे आणि दावे करत आहेत.

शरद पवारांच्या संमतीनेच पहाटेचा शपथविधी; देवेंद्र फडणवीसांचा मोठा दावा

पुढे बोलताना राऊत म्हणाले की, सध्याचे हे सरकार आऊट घटकेचं सरकार असून, 100% त्यांचं सरकार पडत आहे. त्यामुळे ते झोपेत बडबडत असतील किंवा जागेपणाने बडबडत असतील त्याकडे फार लक्ष द्यायची गरज नाही. शरद पवारांनी नेमकं काय केलं आहे. आमच्याशी बोलत होते. तुम्ही प्रयोग केला आणि तो प्रयोग फसला आहे.

काय म्हणाले राऊत?
पवारांची बाजू घेताना राऊत म्हणाले की, फडणवीस यांच्याकडे कोणताही नवीन मुद्दा नाहीये. त्यांचे जे हे सरकार चाललं आहे ते आऊट घटकेचे सरकार असून, सुप्रीम कोर्टाने निर्णय घेण्याचा जो कालावधी दिला आहे तो अर्धा निघून गेलेला आहे. त्यामुळे शंभर टक्के हे सरकार पडणार आहे. त्यामुळे फडणवीस कदाचित झोपेत बडबडत असतील किंवा जागेपणाने बडबडत असतील त्याकडे फार लक्ष देण्याची गरज नाही. पवारांनी जर एखादी गोष्ट केली आहे तर, त्यात एवढे नवीन काय आहे. पवार साहेब आमच्याशी बोलत होते असे म्हणत तुम्ही प्रयोग केला तुमचा प्रयोग फसला ही एका ओळीची गोष्ट असल्याचेही राऊत म्हणाले.

तुमचा प्रयोग फसला तो अंगलट आला तसेच मतदारांनी तुमच्याकडे गांभीर्याने पाहिले नाही. पवारांनी कोणताही डबल गेम खेळला नसल्याचे म्हणत ते म्हणाले की, सरकार स्थापन केले ठाकरे मुख्यमंत्री बनले या सर्वा गोष्टींना पवारांनी पूर्णपणे पाठिंबा दिला हे अधोरेखित सत्य आहे. त्यात तुम्ही पहाटेचा शपथविधी केला काय केलं तो तुमचा प्रश्न आहे. मात्र, केलेला हा प्रयोग फसला हे सत्य आहे.

विदर्भ, मुंबईतील ‘या’ लोकसभा जागेवरून काँग्रेस-ठाकरे गटात होणार ताणाताणी ?

मणिपूरच्या जनतेचा सरकारशी संवाद तुटलेला 

यावेळी राऊतांनी मणिपूरमधील सध्याच्या परिस्थितीवरही भाष्य केले. ते म्हणाले की, मणिपूरच्या जनेतेचा सरकारशी संवाद तुटलेला असून, याचा अर्थ त्या ठिकाणी अराजकता माजलेली आहे. सरकारने पलायन केलेले. मणिपूर अस्थिर करण्यामागे चीनचा हात आहे हे स्पष्ट असून, अशा परिस्थितीत पंतप्रधानांनी जाऊन आपलं एक राज्य जे पेटलं आहे ते शांत करणं गरजेचं आहे. मात्र, तसे होत नसून, देशाचे संरक्षणमंत्री जम्मूला जातात आणि पाकिस्तानला दम देतात. त्याऐवजी मणिपूरला जा आणि चीनला डोळे वटारून दाखवा असा सल्ला राऊतांनी दिला आहे.

संवाद साधून मार्ग निघणार असेल तर…

मणिपूरमधील परिस्थितीवर देशाचे गृहमंत्री आणि प्रधानमंत्री दोघेही बोलत नाहीत म्हणून राहुल गांधी तेथे जात असतील तिथल्या जनतेशी संवाद साधणार असतील त्यातून काही मार्ग निघणार असेल तर, राहुल गांधींच्या मणिपूर भेटीचं आम्ही स्वागत करतो असेही राऊतांनी यावेळी सांगितले. गृहमंत्र्यांकडे आम्ही मागणी केली की सर्वपक्षीय शिष्टमंडळ घेऊन मणिपुरला जावं, जर राहुल गांधी यांनी तयारी दर्शवली तर आम्ही त्यांचे नक्कीच स्वागत करू.

Rocky Aur Rani Ki Prem Kahani चं पहिलं गाणं रिलीज; अल्पावधीतच प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद

ऑन UGC

यावेळी राऊतांनी समान नागरी कायद्यावरही परखड मत व्यक्त केले. ते म्हणाले की, देशात सध्या निवडणुका आलेल्या आहेत. त्यात सरकारकडे कोणताही मुद्दा नाहीये.
एखाद्या विषयावर हिंदू- मुस्लिमांमध्ये तणाव निर्माण करून निवडणुका जिंकता येतील का? मतांचे विभाजन करता येईल का? त्यासाठी हे सर्व सुरू आहे. समान नागरी कायदा हा फक्त धार्मिक क्षेत्रात नको. आर्थिक, सामाजिक,राजकीय क्षेत्रात देखील हवा ही आमची भूमिका स्पष्ट आहे. एक कायदा एकनाथ शिंदे यांच्यासाठी वेगळा आहे आणि भिवंडीमधील नगरसेवकांसाठी वेगळा आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये समान नागरी कायदा असावा.आर्थिक सामाजिक राजकीय धार्मिक क्षेत्रातदेखील हा समान नागरी कायदा असावा अशी मागणी राऊतांनी यावेळी केली.

Tags

follow us