शरद पवारांच्या संमतीनेच पहाटेचा शपथविधी; देवेंद्र फडणवीसांचा मोठा दावा

शरद पवारांच्या संमतीनेच पहाटेचा शपथविधी; देवेंद्र फडणवीसांचा मोठा दावा

Devendra Fadnavis On Sharad Pawar : राज्यातील 2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रामध्ये (Maharashtra) महाविकास आघाडीचं (Mahavikas Aghadi)सरकार स्थापन होत असल्याच्या चर्चा सुरु असतानाच देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)आणि अजित पवार (Ajit Pawar)यांनी पहाटेचा शपथविधी उरकवला. त्यानंतर राज्यभरात एकच खळबळ उडाली होती. त्या शपथविधीबद्दल आजही अनेकजण गौप्यस्फोट करत असतात. त्यातच आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत एक मोठा दावा केला आहे. पहाटेचा शपथविधी हा शरद पवार (Sharad Pawar)यांच्या संमतीनेच झाला असल्याचा दावा देवेंद्र फडणवीसांनी केला आहे. (Devendra Fadnavis criticize on Sharad Pawar Morning oath ajit pawar NCP BJP)

भाजपचे ‘सुमार’ मंत्री फडणवीसांच्या रडारवर; कामगिरी सुधारा अन्यथा…

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एका वृत्तवाहिनीने मुलाखत घेतली. यावेळी मुलाखतीत विविध विषयांवर त्यांना प्रश्न विचारण्यात आले. त्याची सडेतोड उत्तरे यावेळी त्यांनी दिली. फडणवीस म्हणाले की, 2019 च्या निवडणुकीनंतर आमची शरद पवार यांच्यासोबत बैठक झाली. महाराष्ट्रामध्ये भाजप-राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सरकार स्थापन होणार असल्याचे ठरले होते.

पंढरपुरात विठू नामाचा गजर! मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली आषाढीची शासकीय महापूजा

सरकार स्थापनेचा संपूर्ण आराखडा तयार करण्यात आला होता. अजित पवार आणि आपण या सरकारचे नेतृत्व करणार असल्याचे ठरले होते. सरकार स्थापनेची आम्ही सगळी तयारी केली होती. मात्र शरद पवार शेवटी क्षणी शरद पवार आपल्या शब्दापासून फिरले अन् त्यांनी माघार घेतली, असेही यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या या मुलाखतीमधील दाव्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. त्यानंतर आता महाविकास आघाडीतील मित्र पक्षांकडूनही यावर प्रतिक्रीया येताना दिसत आहेत. त्यावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.

या मुलाखतीवरुन राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. खासदार राऊत यांनी एका वाक्यात यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, तुम्ही एक प्रयोग केला आणि तो फसला अशा खोचक शब्दांमध्ये खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube