Konkan Railway : पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे या मुसळधार पावसाचा कोकण रेल्वेला मोठा फटका बसला आहे. (Rain) त्यामुळे दिवाणखवटी बोगद्याजवळ दरड कोसळली असून गेल्या जवळपास १४ तासांपासून कोकण रेल्वे सेवा ठप्प आहे. यामुळे प्रवासी प्रचंड त्रस्त झाले आहेत. माहितीनुसार, दरड काढण्यासाठी आणखी तीन ते चार तास लागण्याची शक्यता आहे. (Railway) रात्रीपासून रेल्वे गाड्या थांबल्या असल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत.
शिंदे मुख्यमंत्री झाले तेव्हा भाजपचे आमदार रडत होते अजितदादांनी सांगितला तो किस्सा
दरड कोसळल्यानंतर संपूर्ण रेल्वे ट्रॅकवर चिखल साचला आहे. ट्रकवरील माती काढण्याचं काम युद्धपातळीवर सुरु आहे. जेसीबीची मदत घेण्यात आली आहे. पण, अद्याप हे काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे रेल्वे रात्रीपासून थांबून आहेत. पावसाचा जोर अद्याप कायम आहे. त्यामुळे माती दूर करण्यास अडथळा निर्माण होत आहे. जोपर्यंत दरड हटवली जात नाही तोपर्यंत रेल्वे गाड्या तेथेच थांबून असणार आहेत.
नगरकरांनो सावधान! पुढील काही तासांत मुसळधार पाऊस; हवामान विभागाचा इशारा
सात गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. खेड रेल्वे स्थानकावर रेल्वे गाड्या उभ्या आहेत. तर पाच गाड्या वेगळ्या मार्गाने हलवण्यात आल्या आहेत. सर्व यंत्रणा कामाला लावण्यात आल्या आहेत. मात्र, अद्याप प्रशासनाला यश आलं नाही. रात्रीपासून हे काम सुरु आहे. पण, अजून रेल्वे मार्ग क्लिअर करता आलेला नाही. त्यामुळे कोकण रेल्वेसेवा ठप्प असणार आहे. वेगवेगळ्या स्थानकावर प्रवाशांची गर्दी झाली आहे.
कोणकोणत्या रेल्वे झाल्या रद्द
- पुणे- एर्नाकुलम नेत्रापती एक्स्प्रेस
- गांधीधाम एक्स्प्रेस
- निझामुद्दीन एर्नाकुलम एक्स्प्रेस