Download App

ED Raid : पुणे, अहमदनगरमध्ये व्हीआयपीएस कंपनीवर ईडीची छापेमारी !, 18 कोटींवर टाच

  • Written By: Last Updated:

ED Raid : व्हीआयपीएस (VIPS Group Of Companies) कंपनीवर ईडीकडून कारवाई करण्यात आली आहे. या कंपनीच्या अहमदनगर, पुणे येथील कार्यालयावर ईडीने छापेमारी केलीय. गेल्या आठवड्याभराच्या कारवाईनंतर या कंपनीची १८ कोटी ५४ लाख रुपये ईडीने जप्त केले आहे. फेमा कायद्यानुसार व्हीआयपीस कंपनीचे मालक विनोद खुटे व इतरांविरुध्द कारवाई करण्यात आली आहे.


बीड : नाराजी नाट्य संपलं?; मुंडे बंधू-भगिनी एकत्र येण्याची परळीत पायाभरणी

ईडीच्या अधिकाऱ्यांनी २५ मे रोजी या कंपनीने पुणे व नगर येथे छापेमारी केली आहे. याबाबतची अधिकृत माहिती ईडीकडून शुक्रवारी जाहीर करण्यात आली आहे. उद्योजक विनोद खुटे व त्याच्या इतर नातेवाइकांविरोधात फेमा कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे.

विनोद खुटे हा सध्या दुबईत राहत आहे. बेकायदेशीरपणे व्यवसाय करणे, क्रिप्टो एक्सचेंज, वॉलेट सर्व्हिस असे व्यवसाय व्हीपीएस ग्रुप आॅफ कंपनीकडून करण्यात येत होते. यातील आलेले पैसे बेकायदेशीरपणे हवालामार्फत अनेक देशांमध्ये पाठविण्यात येत असल्याचे ईडीच्या कारवाईतून उघडकीस आले आहे. अॅफेलेटिंग मार्केटिंगद्वारे वस्तूंची विक्री केली जात होती.

‘बृजभूषण सिंहला अटक करा अन्यथा…’ केंद्र सरकारला 9 जूनपर्यंतचा अल्टिमेटम

त्यासाठी ई कॉमर्स शॉपिंग पोर्टलचा वापर करण्यात येत होता. ग्लोबल अफिलेट बिझनेस (Global Affiliate Business) द्वारे मल्टिलेव्हल मार्केटिंग स्कीम राबविण्यात येत होत्या. हा चेन मार्केटिंगचा प्रकार आहे. त्यासाठी गुंतवणूकदारांकडून 125 कोटी रुपये जमा करण्यात आलेले आहेत.

या ग्रुपची कना कॅपिटल ही कंपनी आहे. या कंपनीमार्फत गुंतवणूक करण्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात येतात. या कंपनीचे व्हीआयपीएस वॉलेट, व्हीआयपीएस फिनस्टॉक नावाचे व्यवसाय आहेत. त्यातून क्रिप्टो विक्री, शेअरची खरेदी विक्रीचे व्यवहार केले जात होते. धनश्री मल्टिस्टेट कॉ-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची फसवणूक करण्यात आलेली आहे.

ग्लोबल अॅफिलिट बिझनेस कंपनीबरोबर अनेक बनावट कंपन्या (शेल) उभारण्यात आलेल्या आहेत. त्याद्वारे १२५ कोटी रुपये जमा करण्यात आलेले आहे. गुंतवणूक केल्यास जास्त व्याज, कमिशन देण्याची नावाखाली फसवणूक करण्यात आली आहे. ईडीच्या चौकशीत वेगवेगळ्या बँक खात्यात १७. ५४ कोटी रुपये असल्याचे आढळून आले आहे. ही रक्कम ईडीने गोठवली आहे.

Tags

follow us