‘बृजभूषण सिंहला अटक करा अन्यथा…’ केंद्र सरकारला 9 जूनपर्यंतचा अल्टिमेटम

‘बृजभूषण सिंहला अटक करा अन्यथा…’ केंद्र सरकारला 9 जूनपर्यंतचा अल्टिमेटम

Wrestlers Protest: गेल्या काही दिवसांपासून भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंग यांच्यावर कारवाईसाठी कुस्तीपटूंचा संघर्ष सुरु आहे. केंद्र सरकारचा निषेध म्हणून कुस्तीपटूंनी आपली पदकं गंगा नदीत विसर्जित करण्याची तयारी केली होती पण शेतकरी नेत्यांच्या मध्यस्तीने खेळाडू परतले होते. आता राकेश टिकैत यांनी केंद्र सरकारला 9 जूनपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे.

कुस्तीपटूंच्या समर्थनासाठी सलग दुसऱ्या दिवशी कुरुक्षेत्र येथे खाप महापंचायत झाली. याआधी गुरुवारी (1 जून) यूपीच्या मुझफ्फरनगरमध्येही महापंचायत झाली, मात्र त्यात कोणताही ठराव होऊ शकला नव्हता. आज झालेल्या महापंचायतीनंतर शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी सरकारला 9 जूनपर्यंतचा अल्टिमेटम देत ब्रिजभूषण सिंग यांच्या अटकेशिवाय कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असे सांगितले. कोणाचाही अपघात झाला तर त्याची जबाबदारी ब्रिजभूषण सिंगची असेल. 9 जूननंतर आम्ही पैलवानांना जंतरमंतरवर सोडू आणि देशभरात पंचायती घेऊ. दोन्ही महापंचायतींमध्ये पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि दिल्ली येथील खापांचे प्रमुख सहभागी झाले होते.

2024 च्या निवडणुकीचे निकाल काय? राहुल गांधींनी केलं मोठं भाकीत

राकेश टिकैत म्हणाले की, आम्ही महिला कुस्तीपटूंना न्याय मिळवून देण्यासाठी देशभरात अशाच प्रकारच्या खाप पंचायतींचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे. शामलीमध्ये 11 जून आणि हरिद्वारमध्ये 15 ते 18 जून दरम्यान पंचायत होणार आहे. टिकैत म्हणाले की, कुस्तीपटूंच्या बाबतीत मधला रस्ता कोणताही असणार नाही आणि ब्रिजभूषण सिंग यांच्या अटकेच्या मागणीवर आम्ही ठाम आहेत. आमच्या महिला कुस्तीपटूंना न्याय मिळाला नाही, तर 9 जूनपासून आम्ही आमच्या अटींवर आंदोलन करू, असा दावा त्यांनी केला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube