Hotel Bhagyashree Owner Kidnapping : हॉटेल भाग्यश्री ‘नाद करतो काय, यायलाच लागतंय’. पुन्हा एकदा चर्चेत आलंय. धाराशिव (Dharashiv) जिल्ह्यात बुधवारी सायंकाळी (23 जुलै) एक धक्कादायक घटना घडली आहे. शहरातील चर्चेतील हॉटेल भाग्यश्रीचे मालक नागेश मडके यांचं अज्ञात इसमांकडून अपहरण करण्यात (Crime News) आलं. ही घटना हॉटेलसमोरच उघडपणे घडल्याने संपूर्ण परिसरात एकच खळबळ (Hotel Bhagyashree Owner Kidnapping) उडाली आहे.
घटना नेमकी कशी घडली?
बुधवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास नागेश मडके (Hotel Bhagyashree) हे आपल्या हॉटेलसमोर उभे होते. त्याचवेळी एक चारचाकी गाडी तिथे थांबली. गाडीतून उतरलेल्या चार-पाच तरुणांनी सेल्फी काढायचा बहाणा करत मडके यांच्याजवळ संपर्क साधला. मात्र काही क्षणातच त्यांनी मडके यांना जबरदस्तीने गाडीत ओढलं आणि तिथून निघून गेले. अपहरणकर्त्यांनी गाडीमध्येच मडके यांना जबर मारहाण केली. एवढंच नाही, तर त्यांना जीवे मारण्याचा कट रचल्याचा आरोप खुद्द मडके यांनी केला आहे. धाराशिवकडे नेत असताना त्यांच्या हालचालींवर पूर्ण बंधन घालण्यात आलं होतं. मारहाणीनंतर या टोळीने मडके यांना वडगाव (सि.) येथील एका पुलाजवळ फेकून दिलं.
देशाच्या नव्या उपराष्ट्रपतींचं नाव ठरलं? दिल्लीत राजकीय हालचालींना वेग, भेटीगाठी अन् बैठकांना उधाण
गाडीच्या आत बेदम मार
याहाण घटनेनंतर मडके यांनी कसाबसा संपर्क साधत आपल्या कुटुंबीयांना परिस्थितीची माहिती दिली. नंतर त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या ते उपचाराधीन असून, डॉक्टरांनी त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगितलं आहे. घटनेनंतरही अद्याप कोणत्याही संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल झालेला नाही. मात्र नागेश मडके यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं की, लवकरच ते आरोपीविरोधात तक्रार दाखल करणार आहेत.
मुंबईच्या रिअल इस्टेट मार्केटची जोरदार चर्चा; घरांच्या विक्रीत तीनपट वाढ, कितीपर्यंत गेला आकडा?
सेल्फीच्या नावाखाली अपहरण
शहराच्या मध्यवर्ती भागात, तेही दिवसाढवळ्या एका उद्योजकाचं अपहरण होणं हे सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न निर्माण करतं. सेल्फीच्या नावाखाली अपहरण करणं ही गुन्हेगारांची नवी रणनीती असल्याचा संशय व्यक्त होतोय. पोलिसांकडून अधिकृत माहिती अजूनही आलेली नाही. सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन आणि वाहन क्रमांकाच्या आधारे तपास सुरू असल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे.