Kasara Ghat Accident : नाशिक – मुंबई महामार्गावर (Nashik – Mumbai Highway) असणाऱ्या कसारा घाटात (Kasara Ghat) एक भीषण अपघात घडला असल्याची माहिती समोर आली आहे. या भीषण अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर 4 जण गंभीर जखमी झाले आहेत.
माहितीनुसार कसारा घाट परिसरात नाशिकहून मुंबईच्या दिशेला जाणारा दुधाचा टँकर थेट दरीत कोसळला. नवीन कसारा घाटातील बलगर पॉईंट (Bulgar Point) जवळ टँकर चालकाचा ताबा सुटल्याने टँकर तब्बल 300 फूट खोल दरीत कोसळला असल्याची माहिती समोर आली आहे.
या अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन टीम दाखल होत मदतकार्य सुरु केलं. आपत्ती व्यवस्थापन टीमने आतापर्यंत पाच मृतांपैकी तिघांचे मृतदेह बाहेर काढले असून तीन ते चार जण दरीत अडकल्याचा अंदाज आहे. जखमींना इगतपुरी आणि कसारा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Rakesh Pal : मोठी बातमी! भारतीय तटरक्षक दलाचे महासंचालक राकेश पाल यांचे निधन
माहितीनुसार, बलगर पॉईंट जवळ टँकर चालकाचा ताबा सुटला आणि टँकर बाजूच्या खोल दरीत कोसळला. यात टँकरमधील पाच जणांचा मृत्यू झाला आहे. पाच मृतांपैकी दोन जण मुंबईतील असल्याची माहिती आहे.
नगर जिल्ह्यात अजित पवारांचा मास्टरस्टोक, रोहित पवारांची जागा धोक्यात?