Maharashtra IMD Alert : संपूर्ण राज्यात आता मान्सूनने (Monsoon) आगमन केल्याने काही भागात मुसळधार तर काही भागात रिमझिम पावसाची सुरुवात झाली आहे. यातच आता हवामान विभागाकडून पुढील चार दिवसांसाठी राज्यातील काही जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील पाच दिवसांसाठी मुंबई (Mumbai), ठाणे (Thane) आणि पालघरमध्ये (Palghar) वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे या भागात विभागाकडून यलो अलर्ट (Yellow Alert) जारी करण्यात आला आहे.
भारतीय हवामानानुसार, पुढच्या 24 तासांमध्ये मुंबई, पालघर आणि ठाण्यात 40 ते 50 किमी प्रतितास वाऱ्याचा वेग राहणार आहे याच बरोबर मुसळधार पावसाचा अंदाज देखील वर्तवण्यात आला आहे. तर रविवार (23 जून) सिंधुदुर्गात रेड अलर्ट हवामान विभागाकडून जारी करण्यात आला आहे. रविवारी सिंधुदुर्गात अति मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर दुसरीकडे 26 तारखेपर्यंत मुंबईत पाऊस सातत्य राखणार आहे अशी देखील माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे.
आजपासून पुढील 5 दिवस दक्षिण कोकणासह संपूर्ण राज्यात पावसाचा जोर वाढणार आहे तसेच या दरम्यान मराठवाड्यात देखील वादळी वाऱ्यासह धो धो पावसाची शक्यता आहे.
Manoj Jarange : मोठी बातमी! अचानक मनोज जरांगेंची प्रकृती खालावली
पश्चिमेकडील वारे पुन्हा जोर धरू लागण्याने पश्चिम किनारपट्टीवर एक कुंड तयार होत आहे ज्यामुळे राज्यात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे अशी माहिती देखील विभागाकडून देण्यात आली आहे.
ओबीसी आंदोलन स्थगित, पंकजा मुंडे म्हणाल्या, माघार घेण्याचा प्रश्नच नाही!