Maharashtra Politics : लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीची दाणादाण (Maharashtra Politics) उडाली. मागील निवडणुकीत 23 जागा जिंकणाऱ्या भाजपला यंदा दोन आकडीही संख्या (Lok Sabha Election) गाठता आली नाही. अजित पवारांच्या राष्ट्रवादीची (Ajit Pawar NCP) अवस्था तर अतिशय दयनीय झाली. राष्ट्रवादी काँग्रेसला फक्त एक जागा जिंकता आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या (Eknath Shinde) शिवसेनेने सात जागा काबीज केल्या. या पराभवानंतर आता महायुतीत मंथन सुरू झालं आहे. त्यातून महायुतीच्या घटक पक्षांत धुसफूस सुरू झाली असू एकमेकांना इशारे देण्यापर्यंत मजल नेत्यांनी गाठली आहे. या सगळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी (Amol Mitkari) दिलेल्या सूचक इशाऱ्याची चर्चा होत आहे.
Lok Sabha 2024 : इलेक्शनमध्ये ट्विस्ट, भाजपला धक्का; यंदा 208 मतदारसंघात पक्षच बदलला
निवडणुकीच्या निकालानंतर आरएसएसच्या ऑर्गनायझर या मुखपत्रातील लेखातही अजित पवारांच्या राष्ट्रवादीवर टीका करण्यात आली होती. यानंतर महायुतीमधील धुसफूस आणखी वाढली. शिंदे गटाच्या नेत्यांनीही अजित पवार यांना सोबत घेण्याबाबत भाजपने पुन्हा विचार करावा अशी वक्तव्ये केली आहेत. त्यामुळे ऐन विधानपरिषदेच्या आणि विधानसभेच्या निवडणुकात जवळ आलेल्या असताना विसंवाद वाढला आहे. अजित पवारांचे आमदार असलेल्या बहुतांश मतदारसंघात महायुतीचे उमेदवार मागे पडले असे आता जाहीरपणे बोलले जात आहे.
यानंतर आता अजित पवार गटातील नेते आक्रमक होताना दिसत आहेत. आमदार अमोल मिटकरी यांनी इशारा दिला आहे. महायुतीच्या पराभवाचं कारण अजित पवार असल्याचं महायुतीच्या बैठकीत सांगितलं गेलं. जर अजितदादांना टार्गेट केलं गेलं तर आम्हाला वेगळा विचार करावा लागेल, असा इशारा अमोल मिटकरी यांनी दिला आहे. त्यांच्या या इशाऱ्यानंतर राजकीय वर्तुळात महायुतीमधील बिघाडीची चर्चा जोरात सुरू झाली आहे.
CM शिंदेंनी शिवतारेंना आवरावं, अन्यथा औकात दाखवू..अमोल मिटकरींचा हल्लाबोल
लेखात महाराष्ट्रातील राजकीय घडामोडीवर टिप्पणी करण्यात आली आहे. महाराष्ट्रात अनावश्यक राजकारणाची गरज नव्हती. ते टाळले गेले असते. भाजप आणि शिंदे गट असे बहुमत असताना अजित पवार यांना सत्तेत का घेण्यात आले? शरद पवार हे दोन-तीन वर्षांत गायब झाले असते. कारण एनसीपीमधील चुलत भाऊ-बहिणीच्या वादात ते आपली ताकद संपवून बसले असते. तरीही चुकीचे पाऊल का उचलले गेले? असा सवाल या लेखात उपस्थित करण्यात आला.
भाजपचे कार्यकर्ते हे काँग्रेसच्या विचारधारेविरुद्ध लढले आहेत. त्यांना काँग्रेस, राष्ट्रवादीने त्रास दिला. अजित पवार यांना बरोबर घेऊन भाजपने आपली किंमत कमी करून घेतली. राज्यात नंबर बनविण्यासाठी अनेक वर्ष संघर्ष केला. परंतु एका झटक्यात राज्यात आणखी राजकीय पक्ष निर्माण करण्यात हातभार लावला, असेही लेखात म्हटले आहे.