Maharashtra Politics : राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला असून राष्ट्रवादीत अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुन्हा एकदा बंडाचे निशाण फडकवले आहे. अजित पवार यांचा आज (2 जुलै) शपथविधी होण्याची शक्यता असून ते उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याची माहिती आहे. राष्ट्रवादीच्या (NCP) 40 आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र घेऊन अजित पवार राजभवनाकडे रवाना झाले आहेत. आता तर त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली असल्याचीही माहिती मिळत आहे. मात्र, या सगळ्या घडामोडीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाची मात्र चांगलीच कुचंबणा होत आहे.
मोठी बातमी : अजित पवार, छगन भुजबळ वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत? शपथविधीची तारीखही ठरली!
महाविकास आघाडीचे सरकार असताना अजित पवार स्वतः उपमुख्यमंत्री होते. अर्थखातेही त्यांच्याकडेच होते. यावेळी शिंदे गटही सरकारमध्ये सामील होता. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसकडून निधी वाटपात सातत्याने दुजाभाव केला जात असल्याची शिंदे गटाची तक्रार होती. निधी वाटपात अजितदादांकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना झुकते माप दिले जात असल्याचा आरोप शिंदे गटाकडून केला जात होता. याबाबत एकनाथ शिंदे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीबी भेट घेतली होती. मात्र, त्याचा काहीच उपयोग झाला नाही.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही त्यावेळी अजित पवार यांच्यावर आरोप केला होता. अजित पवारांकडून निधी वाटपात दुजाभाव केला जातो. शिवेसनेच्या आमदारांना अजित पवार त्रास द्यायचे अशा तक्रारीही येत होत्या. काँग्रेस आमदारांनाही असाच त्रास दिला जात होता. निधी मिळत नव्हता. त्याचा विरोध आम्ही करायचो आणि हा विरोधही स्वाभाविक होता असं पटोले यांनी त्यावेळीच सांगितलं होतं.
Ajit Pawar News : अजितदादांची उपमुख्यमंत्री म्हणून पाचवी शपथ…
नरहरी झिरवळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, छगन भुजबळ, किरण लहमाटे, निलेश लंके, धनंजय मुंडे, रामराजे निंबाळकर, दौलत दरोडा, मकरंद पाटील, अनुल बेणके, सुनिल टिंगरे, अमोल मिटकरी, अदिती तटकरे, शेखर निकम, निलय नाईक, अशोक पवार, अनिल पाटील, सरोज अहिरे हे राष्ट्रवादीचे आमदार अजित पवार यांच्यासह सोबत आहेत.