Maharashtra Rain : पावसाचे कमबॅक! आज ‘या’ जिल्ह्यांत धो-धो बरसणार

Maharashtra Rain : राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. काल राज्यातील अनेक जिल्ह्यात जोरदार पाऊस (Maharashtra Rain) झाला. विदर्भातील अमरावती जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही पावसाने जोरदार (Rain) हजेरी लावली. त्यानंतर नगर जिल्ह्यातही अनेक तालुक्यात संततधार पाऊस सुरू होता. मागील आठवड्यापासून पाऊस होत असला तरी आधीचा दीड महिना पाऊस न झाल्याने अनेक ठिकाणी […]

Rain Alert : आजही मुसळ'धार'! 'या' जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट

Rain Alert : आजही मुसळ'धार'! 'या' जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट

Maharashtra Rain : राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. काल राज्यातील अनेक जिल्ह्यात जोरदार पाऊस (Maharashtra Rain) झाला. विदर्भातील अमरावती जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही पावसाने जोरदार (Rain) हजेरी लावली. त्यानंतर नगर जिल्ह्यातही अनेक तालुक्यात संततधार पाऊस सुरू होता. मागील आठवड्यापासून पाऊस होत असला तरी आधीचा दीड महिना पाऊस न झाल्याने अनेक ठिकाणी पावसाची (Weather Update) मोठी तूट दिसत आहे.

दरम्यान, आजही हवामान विभागाने पावसाचा यलो आणि ऑरेंज अलर्ट दिला आहे. राज्यातील सर्वच जिल्ह्यात पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पावसासाठी अनुकूल वातावरण तयार झाले आहे. गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे. तर विदर्भातील सर्व जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे. सोलापूर, नंदूरबार, सांगली जिल्हा वगळता सर्व ठिकाणी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे आज राज्यात सर्वत्र जोरदार पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Dhangar Reservation : चौंडीतील उपोषणकर्त्याची प्रकृती खालावली, उपोषणास्थळीच ऑक्सिजन लावले…

विदर्भातील अमरावती, नागपूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. गोंदिया जिल्ह्यात गुरुवारी रात्रीपासून संततधार पाऊस सुरू आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात काल मुसळधार पाऊस झाला. अवघ्या चार तासातच 97 मिमी पावसाची नोंद झाली. जालना जिल्ह्यातही हलका पाऊस सुरू होता. या पावसामुळे सोयाबीन, मका, कपाशी या पिकांना जीवदान मिळाले.

अंबड तालुक्यातील पारनेर तांडा शिवारात काल रात्री वीज पडून लिंबाचे झाड जळून खाक झाले. तर विदर्भातील अकोला, अमरावती जिल्ह्यात वीज पडून दोन जण ठार झाले. सोलापूर जिल्ह्यातही अनेक भागात दमदार पाऊस झाला. तसे पाहिले तर यंदा जुलै महिन्याच्या सुरुवातीचे काही दिवस सोडले तर समाधानकारक पाऊस झालेला नाही. ऑगस्ट महिना तर कोरडाच गेला. आता सप्टेंबर महिन्यात काही ठिकाणी पाऊस होत असला तरी तो अत्यंत अल्प आहे.

मोठ्या पावसाची अनेक ठिकाणी प्रतिक्षा कायम आहे. आता जो पाऊस होत आहे तो पुरेसा नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे चांगला पाऊस होईल याची वाट पाहिली जात आहे. समाधानकारक पाऊस झाला तर खरीप पिकांना जीवदान मिळेल. आता पावसाचा परतीचा प्रवास सुरू होईल त्यामुळे या काळात चांगल्या पावसाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Weather Update : ‘या’ जिल्ह्यांत मुसळधार; हवामान विभागाचा अंदाज काय ?

Exit mobile version