Weather Update : ‘या’ जिल्ह्यांत मुसळधार; हवामान विभागाचा अंदाज काय ?

Weather Update : राज्यात बाप्पाचं आगमन होऊन दोन दिवस उलटले आहेत. गणरायाच्या स्वागताला मेघराजा (Weather Update) बरसतो असं बऱ्याचदा दिसलं आहे पण, यंदा मात्र पावसाने (Rain) चांगलीच दडी मारली आहे. राज्यात काही ठिकाणी पाऊस (Maharashtra Rain) होत असला तरी बहुतांश भाग कोरडा ठणठणीत पडला आहे. येथे पावसाची अत्यंत आवश्यकता असताना हवामान विभागाने आणखी एक अंदाज व्यक्त केला आहे. राज्यात येत्या चार ते पाच दिवसात वेगवेगळ्या जिल्ह्यांत पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने राज्यात पाऊस होईल असा अंदाज आहे.
काही जिल्ह्यात हलक्या आणि मध्यम स्वरुपात पाऊस (Weather Update) होईल. मागील दोन ते तीन दिवसांपासून नाशिक, जळगाव, धुळे, मुंबई, कोकण, ठाणे आणि पुणे जिल्ह्यात हलक्या स्वरुपाचा पाऊस होत आहे. रत्नागिरी, सातारा, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, गडचिरोली, भंडारा, जालना, नांदेड आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतही तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली.
Road Accident : नगर-कल्याण हायवेवर भीषण अपघात; तरुणीसह महिला जागीच ठार
यानंतर आता हवामान तज्त्र के. एस. होसळीकर यांनी एक्सवर एक पोस्ट लिहीली आहे. यामध्ये त्यांनी राज्यात 21 सप्टेंबरपासून मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले (Weather Update) आहे. त्यामुळे राज्यात येत्या चार ते पाच दिवसात पिवळ्या इशाऱ्याने दर्शवल्या गेलेल्या तुरळक ठिकाणी गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण, गोव्यातही काही ठिकाणी मुसळधार पाऊस होईल, अशी माहिती होसळीकर यांनी या पोस्टमध्ये दिली आहे. हा पाऊस झाला तर खरीप हंगामातील पिकांना मोठा दिलासा मिळेल.
20 Sept, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने, येत्या राज्यात अंतर्गत जिल्ह्यांमध्ये ह्या ४,५ दिवसांत पिवळ्या इशाऱ्याने दर्शविल्या गेलेल्या तुरळक ठिकाणी, गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
कोकण गोव्यातही काही मुसळधार पाऊस पडेल@ClimateImd @RMC_Mumbai @imdnagpur pic.twitter.com/6Jg7P2xNA5— K S Hosalikar (@Hosalikar_KS) September 20, 2023
तसे पाहिले तर यंदा जुलै महिन्याच्या सुरुवातीचे काही दिवस सोडले तर समाधानकारक पाऊस झालेला नाही. ऑगस्ट महिना तर कोरडाच गेला. आता सप्टेंबर महिन्यात काही ठिकाणी पाऊस होत असला तरी तो अत्यंत अल्प आहे. मोठ्या पावसाची अनेक ठिकाणी प्रतिक्षा कायम आहे. आता जो पाऊस होत आहे तो पुरेसा नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे चांगला पाऊस होईल याची वाट पाहिली जात आहे. समाधानकारक पाऊस झाला तर खरीप पिकांना जीवदान मिळेल. आता पावसाचा परतीचा प्रवास सुरू होईल त्यामुळे या काळात चांगल्या पावसाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.