मुंबई : कोरोना विषाणूने आता पुन्हा एकदा डोकं वर काढल्याचं दिसून येत आहे. राज्यात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा दीड हजारांपेच्या पार गेला आहे. ही रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसांपासून वाढतच चालली आहे.
काल बुधवारी राज्यात 334 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. 334 रुग्णांची भर पडल्याने आता राज्यात 1648 कोरोनाबाधित रुग्ण सक्रिय आहेत. तसेच एका बाधित रुग्णाचा आज मृत्यू झाला आहे.
नारायण राणेंना शिवसेना सोडायची नव्हती पण, बाळासाहेबांनी..; राज ठाकरेंनी सांगितला ‘तो’ प्रसंग !
राज्याच्या अर्थिक राजधानी मुंबईसह ठाणे, पुणे शहरांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून येण्याचं प्रमाण अधिक असून या जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.
राज्यातील सर्वाधिक रुग्णांमध्ये पुणे शहर आघाडीवर आहे. पुण्यात 496 कोरोनाबाधित रुग्ण असून मुंबईत 361 तर ठाण्यात 314 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
तामिळनाडूत फटाक्याच्या कारखान्याला भीषण आग, 8 जणांचा मृत्यू, 17 गंभीर जखमी
तर दुसरकडे अनेक रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी परतत असून आत्तापर्यंत एकूण 79,90, 401 कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर मात केली असून बरे होण्याचं प्रमाण 98. 5 टक्के इतकं झालं आहे.
राज्यात बुधवारी केवळ एका रुग्णाचा मृत्यू झाला असून मृत्यूदर हा 1.82 टक्के इतका झाला आहे. आता राज्यातील कोरोनाबाधित रुग्णाांची एकूण संख्या 81,40,479 इतकी झाली आहे.
बापटांची राजकीय संस्कृती जपतांना धंगेकर आणि रासने… निवडणुकीनंतर पहिल्यांदा आमनेसामने
राज्यात आतापर्यंत एकूण 8,65,63,502 इतक्या प्रयोगशाळा तपासण्या झाल्या आहेत. त्यापैकी 9.40 टक्के नमुने हे पॉझिटिव्ह सापडले आहेत.
दरम्यान, पुण्यासह राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. पुन्हा एकदा नागरिकांनी मास्क लावण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.
तर काल झालेल्या आढावा बैठकीत पंतप्रधान मोदींनी सावध आणि सतर्क राहण्याचा सल्ला दिला असून या बैठकीत इन्फ्लूएंझा आणि कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रसाराबाबत चर्चा करण्यात आल्याचं समजतंय.