बापटांची राजकीय संस्कृती जपतांना धंगेकर आणि रासने… निवडणुकीनंतर पहिल्यांदा आमनेसामने

बापटांची राजकीय संस्कृती जपतांना धंगेकर आणि रासने… निवडणुकीनंतर पहिल्यांदा आमनेसामने

पुणे : काही दिवसांपूर्वी झालेल्या पोटनिवडणूकीत तब्बल 28 वर्षानंतर भाजपच्या उमेदवाराचा पराभव झाला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर हे भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांचा पराभव करून विजयी झाले. धंगेकर यांनी भाजपच्या बालेकिल्लाला सुरूंग लावल्यानं गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात धंगरेकर यांच्याच नावाची चर्चा सूरू आहे. दरम्यान, आज नवनिर्वाचित आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) आणि पराभूत उमेदवार हेमंत रासने (Hemant Rasane) निवडणुकीनंतर पहिल्यांदाच समोरासमोर आले. भाजप खा. गिरीश बापट यांच्या निधीतून साकारलेल्या भित्ती चित्राचं लोकार्पण आज झालं. त्यासाठी हे दोन्ही नेते एकत्र आले होते.

कसबा निडणुकीत हेमंत रासने आणि रवींद्र धंगेकर यांच्यात अटीतटीची लढत झाली होती. या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान, या दोघांनीही एकमेकावर ताशेरे ओढले होते.
आणि आता निवडणुकीनंतर हे दोघेही पहिल्यांदाच एकऊ आल्यानं सर्वांचंच लक्ष त्यांच्याकडे लागलं होतं. मात्र, यावेळी दोघेही हसत हसत भित्ती चित्राच्या लोकार्पण कार्यक्रमात सहभागी झाले होते. या दोघांनी मिळून भित्ती चित्राचं अनावरण केलं आणि एकमेकांसोबत हातही मिळवला.

यावेळी माध्यमांशी बोलतांना आ. रवींद्र धंगेकर म्हणाले की, मागील तीन दशक खासदार गिरीश बापट यांनी शहरात काम केले असून राजकीय स्तर कसा ठेवावा त्यांनी वेळोवेळी दाखवून दिलं. आम्हाला आज गुढीपाडवा सणाच्या निमित्ताने एकत्रित आणण्याच काम त्यांनी केले आहे. त्यामुळे मी खासदार गिरीश बापट यांचे धन्यवाद मानतो. तसेच समाजातील प्रत्येक घटकाला सोबत ठेवून आणि त्याचा समतोल कसा राखला जाईल असं काम त्यांनी केल आहे. मी बापट यांच्या विरोधात दोन वेळेस विधानसभा निवडणुक लढवली. मात्र, त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून काम करण्याचं मी प्रयत्न करत आलो. त्यांच्याकडून बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. यापुढे देखील बापट यांच्याच पद्धतीने काम करीत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Bisleri : बिसलेरीची कमान जयंती चौहान यांच्या हातात नाहीच; या नावाची चर्चा
ते पुढे म्हणाले की, मी आणि हेमंत रासने यांनी 15 वर्ष एकत्रित पुणे महापालिकेमध्ये काम केले आहे.त सेच हेमंत रासने यांना पुणे महापालिकेमध्ये चार वेळा स्थायी समिती अध्यक्षपदाचा अनुभव असल्याने आगामी काळात मतदार संघातील काम करतेवेळी त्यांच्या अनुभवाचा मला निश्चित फायदा होणार आहे. मात्र लोकशाहीमध्ये जनता ठरवित असते. विजय आणि पराजय असतो आणि आपल्या खांद्यावर जी पताका असते, ती पुढे पुढे घेऊन जायची असते आणि मी काही अमरपट्टा घेऊन आलो नाही. पण समाजाची सेवा करीत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मला रासने यांच्यामुळं देशभरात नागरिक ओळखायला लागले, असं म्हणताच उपस्थितमध्ये एकच हशा पिकला. तसेच आम्ही दोघेही मित्र असून निवडणुकीच्या काळात आम्ही एकमेकांना भेटू शकलो नाही. मात्र, आता आम्ही दोघे मतदार संघाच्या विकास कामासाठी एकत्रित काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पत्रकारांनी रासने यांना विचारलं की, तुम्ही दोघे प्रतिस्पर्धी असून आता एकत्र आला, त्याविषयी काय वाटतं? यावर बोलतांना रासने म्हणाले की, आम्ही कधीच प्रतिस्पर्धी नसतो. आम्ही केवळ दोन वेगवेगळ्या मत प्रवाहाचे उमेदवार असतो. तसेच आम्ही केलेल्या कामांचा आशिर्वाद लोकांकडे मागत असतो. त्यामध्ये जनता दोघांना देखील आशिर्वाद देत असते. मात्र जनता ज्या उमेदवाराला अधिक आशिर्वाद देते तो निवडून येतो आणि दुसरा त्याच्या पद्धतीने काम करीत असतो. तसेच आम्ही दोघे यापुढील काळात देखील शहराच्या विकास कामांसाठी एकत्रित येऊ असे त्यांनी सांगितले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube