Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी जो लढा सुरु आहे त्याचं नेतृत्व करणारे मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी काही दिवसांपासून मराठवाड्यात शांतता रॅली आयोजीत केलेली आहे. बीड, जालना नांदेड उस्मानाबाद अशा अनेक जिल्ह्यात त्यांची रेकॉर्डब्रेक शांतता रॅली झाली. (Maratha Reservation) आज या रॅलीचा छत्रपती संभाजीनगरात समारोप होत आहे. (Marathwada) त्या पार्श्वभूमीव छत्रपती संभाजीनगरमधील क्रांती चौकात जय्यत तयारी करण्यात आली आहे. मागील एक महिन्यापासून ही तयारी सुरू आहे.
क्रांती चौकात तयारी सत्ताधारी आणि विरोधक हे सगळे एकाच माळेचे मनी…; मनोज जरांगेंचा हल्लाबोल
समारोप होणाऱ्या क्रांती चौकात लाखो मराठाबांधवांसाठी जागा अपुरी पडण्याची शक्यता आहे. हा प्रश्न लक्षात घेऊन सकल मराठा समाजातर्फे क्रांती चौकाच्या परिसरात जिथे जिथे मराठा बांधव आलेले असतील तिथवर आवाज पोहचेल, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. असं नियोजन क्रांती चौकाच्या इतिहासात प्रथमच होत आहे. मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे विचार ऐकण्यासाठी क्रांती चौकाच्या चारही दिशेला भोंगे लावण्यात आले आहेत. मराठा बांधवांचा मुख्य फ्लो सिडकोकडून येणार असल्याने दूध डेअरी चौकापर्यंत आवाज देण्यात येणार आहे.
अेक ठिकणी साऊंड
अडीचशे ते तीनशेवर भोंगे लावण्यात येणार आहेत. काही ठिकाणी उंच टॉवर उभं करण्यात आलं असून, या टॉवरवर आठ तर काही टॉवरवर १२ भोंगे लावण्यात आले आहेत. याशिवाय रस्त्यावरील उंच पोलवरही भोंगे असतील. क्रांती चौकातील उड्डाणपुलावर सर्वच बाजूंनी भोंगे बांधले असून क्रांती चौकाखाली हॅंगिंग साउंड असतील. जागेचा अभाव असल्याने रस्त्यावर दूरदूर थांबलेल्या मराठा बांधवांसाठी साउंडची व्यवस्था करण्यात आली आहे.
मुख्य व्यासपीठ गिरीश महाजन माणसाला फसवतो, ज्या ज्या आंदोलनात हा माणूस बीडमधून जरांगेंचा हल्लाबोल
मुख्य व्यासपीठ क्रांती चौकात उभारण्यात आले आहे. हे व्यासपीठ १६ बाय ४० या आकाराचं बनवण्यात आलं असून, व्यासपीठाची सहा फूट उंची असेल. व्यासपीठावर शिवरायांचे भव्य स्मारक असेल. शिवरायांना अभिवादन केल्यानंतर जरांगे पाटील आपले विचार मांडतील. अंतरवाली सराटी येथे जरांगे पाटील यांनी लाखो मराठ्यांशी संवाद साधला. त्याठिकाणी असलेले शिवरायांचे स्मारक खुलताबादेतील मूर्तिकार नरेंद्रसिंग सोळुंके यांनी तयार केले आहे. हेच स्मारक वाशी, मुंबईच्या पदयात्रेदरम्यान होते. ते स्मारक वसंतराव नाईक चौकात नऊ वाजता आणण्यात येईल. शिवरायांना अभिवादन केल्यानंतर प्रत्यक्ष रॅलीला सुरुवात होईल.
जेसीबीतून फुलांची उधळण
दूधडेअरी चौकातून क्रांती चौकापर्यंत जरांगे पाटील यांच्यावर फुलांचा वर्षाव करण्यासाठी १० जेसीबी उभ्या असतील. याशिवाय प्रत्येक चौकात एक रुग्णवाहिका, एक मोबाइल टॉयलेट व्हॅन आणि एक पाण्याचे टॅंकर उभं असेल. कोणतीही अडचण येणार नाही, असं नियोजन सकल मराठा समाजातर्फे करण्यात आलं आहे. चौकाचौकात बॅनर, झेंडे, नाश्त्याची सोय हर्सूल टी पॉइंट ते सिडको सिग्नल आणि सिडको सिग्नल ते क्रांती चौकापर्यंत पाच हजारांहून अधिक झेंडे लावण्यात येतील. सिडको चौक ते बाबा पेट्रोल पंपापर्यंत चौकाचौकात चहापाणी, पुलाव, खिचडी व पाणी बॉटल वाटप करण्यात येईल.
रॅलीची धुरा महिलांकडे MLC Election : मातोश्रीपासून विधानभवनापर्यंत ठाकरेंचे राईट हॅन्ड नार्वेकरांनी बाजी मारली
रॅलीच्या अग्रभागी पाचशे स्वयंसेवक महिला असणार असून, त्या रॅलीचं नेतृत्व करतील. विधासनभा अधिवेशन सुरू असून, या पंचवार्षिक योजनेचे शेवटचे अधिवेशन आहे. विशेष म्हणजे, १३ जुलै हा अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे, तोच दिवस सरकारने मराठा समाजाला दिला आहे. जर काही ठोस सरकारने जाहीर केले नाही, तर समारोप रॅलीमध्ये मनोज जरांगे पाटील हे मुंबईला जायचे, की २८८ आमदार पाडायचे, ही भूमिका जाहीर करणार आहेत, अशी माहिती सकल मराठा समाजातर्फे देण्यात आली आहे.
अशी आहे पार्किंग व्यवस्था