Download App

Maratha Reservation : ‘जीव धोक्यात गेल्याशिवाय समाजाचं..,’; जरांगे पाटलांनी थेट सांगून टाकलं

Maratha Reservation : कोणाचा तरी जीव धोक्यात गेल्याशिवाय समाजाचं कल्याण होणार नाही, माझं ह्रदय बंद पडलं तर सरकारचंही ह्रदय बंद पडणार असल्याचं विधान मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी केलं आहे. दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या चार दिवसांपासून मनोज जरांगे यांनी आमरण उपोषणाचा पवित्रा घेतला आहे. जालन्यातील अंतरवली सराटीत मनोज जरांगे यांचं उपोषण सुरु आहे. मनोज जरांगे यांच्यापाठोपाठ राज्यातील अनेक गावांमध्ये मराठा आंदोलकांकडून उपोषण सुरु करण्यात आलं आहे.

Maratha Reservation : केसरकर, विखे पाटील, महाजनांचे फ्लेक्स फाडले; नेत्यांविरोधात रोष वाढला

मागील चार दिवसांपासून मनोज जरांगेंचं उपोषण सुरु असतानाच अद्याप सरकारकडून कोणतीही ठोस भूमिका घेतल्याचं पाहायला मिळालेलं नाही. त्यामुळे अखेर मनोज जरांगे यांनीच सरकारला चर्चेसाठी पुढील दोन दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. पुढील दोन दिवस मी बोलू शकतो, काय बोलायचं असेल तर बोला, असं मनोज जरांगे म्हणाले आहेत.

Horoscope Today: आज ‘या’ राशींना मिळणार चांगली बातमी! मोठा धनलाभ होण्याची शक्यता

तसेच सरकारला आरक्षण द्यायचं नसेल तर मराठ्यांचा सामना करावा लागणार आहे. कुणाचातरी जीव धोक्यात गेल्याशिवाय समाजाचं कल्याण होणार नाही. माझ्या हृदयाला काहीही होणार नाही. माझं हृदय बंद पडलं तर सरकारचंही हृदय बंद पडेल. मला काहीही झालं तरी मराठा समाज आंदोलन करणारच असल्याचं ते म्हणाले आहेत. चर्चेला येऊ देत नाहीत असं कारण देत सरकार आरक्षण देणार नाही. त्यामुळे दोन दिवस चर्चेसाठी मी तयार आहे. त्यानंतर मला बोलता येणार नसल्याचंही जरांगे पाटलांनी जाहीर केलं आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सरकारवर दबाव आणणार; आमदार संग्राम जगतापांचे मोठे विधान

सरकारचं कोणतंही उत्तर मिळालं नाही अथवा संवाद नाही. 30-31 ऑक्टोबरपर्यंत आम्ही वाट पाहू. सरकारला माणुसकी समजत नाही आम्ही त्यांना उत्तर देऊ, असा इशारा जरांगे पाटलांनी दिला. सरकारने आमच्या लेकराबाळांचा विचार करावा. मराठा समाजाने शांततेत आंदोलन करावं. मी आधी माझ्या समाजाचा आहे नंतर कुटुंबाचा आहे. सरकारने वेळ वाया न घालवता तत्काळ आरक्षण द्यावं. आपल्याला आरक्षण मिळणार आहे तेव्हा गडबड करू नका असेही जरांगे पाटील यांनी सांगितले.

दरम्यान, प्रसारमाध्यमांच्या कॅमेऱ्यासमोर चर्चा होत नसते समोरासमोर येऊन चर्चा केली पाहिजे असे वक्तव्य फडणवीस यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्यावर जरांगे पाटील यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली. मग मी काल काय म्हणालो होतो. तुम्ही चर्चेला या मराठे तुम्हाला अडवणार नाहीत. फडणवीसांच्या कानात काय बोळे घातले आहेत का? असा सवाल करत आरक्षण द्यायचे की नाही एकदाच काय ते सांगून टाकायचे बाकीची वळवळ करायची नाही, असे जरांगे पाटील म्हणाले.

follow us