Download App

उमेदवार बदलण्याचा मुख्यमंत्री शिंदेंचा डाव फसला; हिंगोलीकरांची ठाकरे गटाला आघाडी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिंगोली लोकसभेचा उमेदवार बदलला. मात्र, त्याचा फायदा होताना दिसत नाही. हिंगोलीकरांचा कौल ठाकरे गटाला.

Hingoli Lok Sabha Exit Poll 2024 : हिंगोली लोकसभा मतदारसंघात हेमंत पाटील गेम चेंजर ठरतील अशी शक्यता आहे. (Exit Poll 2024 ) कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विद्यमान खासदार हेमंत पाटील यांना जाहीर केलेली उमेदवारी मागे घेतली आणि तिथंच डाव फसला.  (Hingoli Lok Sabha) आता हिंगोली मतदारसंघात उद्धव ठाकरे गटाचे नागेश पाटील आष्टीकर बाजी पलटवतील असे सध्याचे एक्झिट पोल आहेत.

आष्टीकर यांना आघाडी    हिंगोलीकर 1991 पासूनची परंपरा राखणार का? युतीला उमेदवार बदलाचा फायदा होणार का?

हेमंत पाटील यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर ती शिंदे यांनी मागे घेतली. त्यानंतर महायुतीची भक्कम ताकद पाठीमागे असलेल्या बाबूराव कदम-कोहळीकार यांना उमेदवारी दिली. परंतु, हे फोडाफोडीचे राजकारण कुणालाही पटलं नसल्याचा फटका बसला आहे. त्यामुळे ‘पोल ऑफ पोल’ने वर्तवलेल्या अंदाजानुसार नागेश पाटील आष्टीकर यांना आघाडी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

पुन्हा संधी नाही

हिंगोलीत शिंदे गटाचे बाबूराव पाटील कोहळीकर आणि ठाकरे गटाचे नागेश पाटील-आष्टीकर यांच्यात लढत झाली. आतापर्यंत युतीविरुद्ध आघाडी असं लढतीचं चित्र होतं . मात्र, यावेळी पहिल्यांदाच दोन शिवसैनिक आमने-सामने उभे राहिले होते. तसंच, हिंगोलीकरांचा 1991 पासून इतिहास राहिलेला आहे. एक उमेदवाराला पुन्हा संधी नाही. त्यामुळे उमेदवार बदलला असला तरी शिंदे गटाला फटका बसणार असा एक्झिट पोल सांगत आहे.

चव्हाण यांना मानणारा उमेदवार

सुरुवातीला या मतदारसंघात महायुतीचं पारडं जड मानलं जात होतं. कारण, या मतदारसंघात भाजपचे प्राबल्य, शिंदे गटाचे एक आमदार आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार हे चित्र पाहता महायुतीला इथं विजय मिळवण सोपं मानलं जात होतं. तसंच, या मतदारसंघात खासदार अशोक चव्हाण यांना मानणारा वर्गही मोठा आहे. एवढी मोठी शक्ती एकवटलेली असताना महाविकास आघाडीचा उमेदवार कितपत टिकेल, असा प्रश्न उपस्थित होत होता.

नेत्यांचा विरोध

येथे ठाकरे गटाने निवडणूक रंगात येण्याअगोदर सभा घेतली होती. त्यामुळे चांगली वातावरण निर्मिती झाली होती. परंतु, शिंदे गटासह महायुतीपुढे ठाकरे गट टिकाव धरणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. निवडणूक प्रचार रंगात आलेला असतानाच ऐनवेळी विद्यमान खासदार आणि शिंदे गटाचे उमेदवार हेमंत पाटील यांच्या उमेदवारीला भाजपच्या स्थानिक नेत्यांनी कडाडून विरोध केला. एवढंच नव्हे, तर उमेदवार बदलण्यासाठी पक्षश्रेष्ठींवर दबाव आणला.

दुहेरी वाद निर्माण           छत्रपती संभाजीनगरमधून विजय फक्त माझाच; एक्झिट पोलचे आकडे मी मानत नाही -भुमरे

शिंदे गटाने थेट विद्यमान खासदार हेमंत पाटील यांची उमेदवारी मागे घेतली. तसंच, हेमंत पाटील नाराज होऊ नयेत, म्हणून त्यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना वाशिम-यवतमाळमधून उमेदवारी देऊन दुहेरी वाद ओढवून घेतला. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांचा हा डाव फसला आणि मतदारसंघातील चित्रच बदलून गेल. परंतु, महायुतीची भक्कम ताकद, बाबूराव कदम यांच्या रूपाने नवा चेहरा दिल्याने या महायुतीच्या जमेच्या बाजू समजल्या जात होत्या. मात्र, यावेळेस एक्झिट पोलच्या अंदाजानुसार नागेश पाटील-आष्टीकर यांना आघाडी मिळण्याची शक्यता आहे.

follow us