हिंगोलीकर 1991 पासूनची परंपरा राखणार का? युतीला उमेदवार बदलाचा फायदा होणार का?

हिंगोलीकर 1991 पासूनची परंपरा राखणार का? युतीला उमेदवार बदलाचा फायदा होणार का?

Hingoli Lok Sabha Election 2024 : लोकसभेला मराठवाड्यात कोण बाजी मारणार यावर गेली दोन महिन्यांपासून कुठेना-कुठे चर्चेचा फड रंगेला असतो. त्यामध्ये मराठवाड्यातील हिंगोली जिल्हा हा बदलाचा कौल दाखवेल की नाही हे सांगता येत नाही. मात्र, निकाल बदलाचा देतो अशी परंपरा राहिलेली आहे. (Lok Sabha) विद्यमन लोकप्रतिनिधी पुन्हा नाही असं या हिंगोलीकरांचं गणित आहे. (Hingoli Lok Sabha) आणि हे गणित आजचे नसून 1991 पासून हिंगोलीमध्ये एकही खासदार सलग दोनदा विजयी झालेला नाही. त्यामुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत हिंगोलीकर काय करतात हे चार तारखेला कळेच. (Marathwada) मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जाहीर झालेला उमेदवार बदलण्याची नामुश्की आली होती.

Osmanabad : राजेनिंबाळकर विरुद्ध पाटील : दोन कुटुंबातील सत्तासंघर्ष  कोण मारणार बाजी?

उमेदवार बदलावा लागला

येथे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं सुरुवातीला विद्यमान खासदार हेमंत पाटील यांना लोकसभेची उमेदवारी दिली होती. हेमंत पाटील विरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नागेश पाटील आष्टीकर असा सामना रंगणार असं वाटत होतं. मात्र, शिंदे यांनी हेमंत पाटील यांची उमेदवारी मागं घेत बाबूराव कदम कोहळीकर यांना उमेदवारी दिली. त्यानंतर चर्चा रंगली ती हिंगोली मतदारसंघ भाजपाला न सोडण्यात शिंदे यशस्वी झाले असले, तरी भाजपाच्या दबावामुळे त्यांना उमेदवार बदलावा लागला.

काँग्रेसचं वर्चस्व 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेमध्ये बंड केल्यानंतर होणाही ही पहिलीच निवडणूक आहे. त्यामुळे येथे शिवसैनिका विरूद्ध शिवसैनिक अशी लढत होईल हे निश्चित मानलं जात होतं. यामध्ये ठाकरे गटाचे नागेश पाटील आष्टीकर हे ग्रामपंचायत पातळीपासून पुढं आलेलं नेतृत्त्व आहे. ते हदगाव विधानसभा मतदारसंघातून 2014 साली विजयी झाले होते. त्यामुळे त्यांचा या भागात जनसंपर्क चांगला असल्याचं चित्र आहे. तसं पाहिलं तर या मतदारसंघात काँग्रेस पक्षाचं वर्चस्व होतं. 2014 मधील मोदी लाटेतही हिंगोलीची जागा जिंकण्यात काँग्रेसला यश मिळालं होतं. राहुल गांधी यांचे निकटवर्तीय नेते दिवगंत राजीव सातव हिंगोलीमधून विजयी झाले होते. दरम्यान, महाविकास आघाडीत ही जागा उद्धव ठाकरेंना सुटली आणि नागेश पाटील यांचा सामना दुसरे शिवसैनिक बाबूराव कदम कोहळीकर यांच्याशी निश्चित झाला.

लोकसभेचा ;लातूर पॅटर्न  देशमुखांच्या बालेकिल्ल्यात कुणाची हवा?, भाजप हॅट्रीक मारणार का?

मतदारसंघाची रचना

या मतदारसंघात हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली, वसमत आणि कळमनुरी, नांदेड जिल्ह्यातले हदगाव आणि किनवट तर यवतमाळ जिल्ह्यातल्या उमरखेड मतदारसंघाचा समावेश होतो. यामधील कळमनुरी, हदगान आणि किनवट या मतदारसंघात आदिवासी मतदारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्याचबरोबर सध्या सहापैकी तीन ठिकाणी भाजपा (हिंगोली, उमरखेड, किनवट) राष्ट्रवादी काँग्रेस (वसमत), शिवसेना, शिंदे गट (कळमनुरी) तर हदगाव मतदारसंघात काँग्रेसचा आमदवार आहे. सहापैकी पाच मतदारसंघ महायुतीच्या तर एक मतदारसंघ हा महाविकास आघाडीकडं आहे. दरम्यान, भाजपाचे तीन आमदार असल्याने पक्षाचा येथे लोकसभा जागेसाठी दावा होता.

मतदारसंघाचा भूगोल

हिंगोली मतदारसंघात ग्रामीण भागाचा जास्त समावेश आहे. त्यामुळे कृषी क्षेत्राशी मुद्दे महत्त्वाचे आहेत. सिंचन व्यवस्था, मोठ्या कृषी उद्योगाचा अभाव, रोजगार, आरोग्य सुविधा हे मुद्दे कळीचे आहेत. मात्र, निवडणुकांमध्ये हवी तशी या मुद्यांची चर्चा होत नाही. दरम्यान, हिंगोलीमध्ये 2019 साली 66.84 टक्के मतदान झालं होतं. यंदा हा टक्का घसरल्याचं समोर आलं. यंदा 63.54 टक्के मतदान झालं. कळमनुरी 63.60, हदगावमध्ये 65.53, किनवट 65.86 हिंगोली 59.92, वसमतमध्ये 62.54, आणि उमरखेडमध्ये 64.37 टक्के इतकं मतदान झालं. या घटलेल्या टक्केवारीचा फायदा कुणाला होणार? याच्यासह एक उमेदवार पुन्हा निवडून न देण्याची परंपरा हिंगोलीकर कायम राखणार का? याकडं सर्वांच लक्ष लागलं आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज