हरियाणात काँग्रेसची लाट अन् जम्मू काश्मीरमध्येही ‘इंडिया’ टॉपवर, महाराष्ट्रावर काय होणार परिणाम?

हरियाणात काँग्रेसची लाट अन् जम्मू काश्मीरमध्येही ‘इंडिया’ टॉपवर, महाराष्ट्रावर काय होणार परिणाम?

Haryana Exit Poll Impact On Maharashtra : नुकतंच हरियाणा (Haryana) आणि जम्मू काश्मीर (Jammu Kashmir) विधानसभेसाठी निवडणुकीची (Election 2024) प्रक्रिया पार पडली आहे. त्यामुळे दोन्ही राज्यात कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे. 08 ऑक्टोबर रोजी दोन्ही राज्यांचे निकाल जाहीर होणार आहे मात्र त्यापूर्वी हरियाणा आणि जम्मु काश्मीर विधानसभेसाठी अनेक एक्झिट पोल (Exit Poll) समोर आले आहे. या एक्झिट पोलमध्ये हरियाणात काँग्रेसची लाट दिसून येत आहे तर जम्मू काश्मीरमध्ये इंडिया आघाडी टॉपवर आहे. जर आठ ऑक्टोबर रोजी एक्झिट पोलनुसार निकाल पाहायला मिळाले तर याचा महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीवर देखील परिणाम होणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.

महाराष्ट्रात येणाऱ्या काही दिवसात विधानसभेसाठी निवडणुकीची (Maharashtra Vidhan Sabha Election) घोषणा होणार आहे. यावेळी राज्यात मुख्य लढत महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीमध्ये (MVA) होणार आहे. त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीमधील घटक पक्षांनी जागावाटपावर चर्चा देखील सुरु केली आहे. त्यामुळे हरियाणा आणि जम्मू काश्मीर विधानसभा निवडणुकीचा निकालाचा परिणाम महायुती आणि महाविकास आघाडीच्या जागावाटपांवर होणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात होत आहे.

सध्या समोर आलेल्या महायुतीमध्ये जागावाटपावरून मोठ्या प्रमाणात मतभेद निर्माण झाले आहे. भाजपला 288 पैकी 155-162 जागा लढवायच्या आहेत तर शिंदे गटाला देखील 100-105 जागा हव्या आहेत तर अजित पवार गट जितके जागा शिंदे गटाला मिळणार तितके जागा आम्हाला द्या अशी मागणी भाजपच्या (BJP) वरिष्ठ नेत्यांकडे करत आहे. त्यामुळे कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून आहे तर दुसरीकडे हरियाणा आणि जम्मू काश्मीरमध्ये काँग्रेसने सरकार स्थापनेचा दावा केला तर महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस (Congress) मोठा भाऊ म्हणून भूमिका घेऊ शकते अशी देखील चर्चा सध्या जोराने सुरु आहे.

तसेच महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये मुख्यंमत्री पदावरून देखील मतभेद निर्माण झाले आहे. महाविकास आघाडीमध्ये शिवसेना मुख्यंमत्री पदाचा चेहरा जाहीर करावा अशी मागणी करत आहे तर शरद पवार गट आणि काँग्रेस निवडणुकीनंतर याबाबत चर्चा करू अशी भूमिका घेतली आहे. तर महायुतीमध्ये देखील शिंदे गट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करण्यात यावा अशी मागणी करत आहे. तर भाजपकडून अद्याप मुख्यमंत्री पदावर कोणताही निर्णय न झाल्याची माहिती समोर आली आहे.

मोठी बातमी! महिला T20 विश्वचषक स्पर्धेमध्ये टीम इंडियाने पाकिस्तानचा 6 विकेटने धुव्वा उडवला

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने महायुतीला धक्का देत 48 जागांपैकी 30 जागांवर विजय मिळवला होता तर महायुतीला फक्त 17 जागांवर विजय मिळवता आला होता. तर एक जागा अपक्षाला मिळाली होती.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube