Download App

ज्योती मेटेंचा लोकसभा न लढवण्याचा निर्णय; पंकजा मुंडेंचे अर्धे टेन्शन संपले!

Beed Lok Sabha Election : बीड लोकसभा मतदारसंघातून एक मोठी बातमी समोर आली आहे. या मतदारसंघातून निवडणूक लढण्यास इच्छुक असलेल्या शिवसंग्राम पक्षाच्या नेत्या डॉ. ज्योती मेटे यांनी निवडणुकीत माघार घेतली आहे. व्यापक समाजहित लक्षात घेऊन आणि मतांचं विभाजन होऊ नये या गोष्टींचा विचार करून मी लोकसभा निवडणूक लढणार नाही, अशी माहिती ज्योती मेटे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

मी बीड लोकसभेची निवडणूक लढवावी ही जनतेची मागणी होती. त्यासाठीच मी सरकारी नोकरीचा राजीनामा दिला होता. नंतरच्या घडामोडी सर्वांना माहिती आहेत. नंतरच्या काळात मी जनतेशी संवाद साधला मात्र समाजहीत हेच मला सर्वस्व आहे. त्यामुळे मी निवडणूक लढणार नाही. पुढील निर्णय प्रदेश पातळीवर घेऊन कुणाला पाठिंबा देणार हे ठरवणार आहोत, असेही ज्योती मेटे यांनी यावेळी सांगितले.

Beed Lok Sabha : बीडच्या मैदानात वंचित आघाडीची एन्ट्री! अशोक हिंगेंची उमेदवारी जाहीर

बीड लोकसभा मतदारसंघात महायुतीने भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली आहे. तर महाविकास आघाडीने बजरंग सोनवणे यांना रिंगणात उतरवले आहे. तसेच वंचित बहुजन आघाडीने अशोक हिंगे यांना तिकीट दिले आहे. या तीन उमेदवारांमुळे बीडची निवडणूक तिरंगी झाली आहे. मात्र याआधी ज्योती मेटे यांच्या नावाचीही चर्चा होती. त्यांनी निवडणुकीची तयारीही केली होती. उमेदवारीसाठी त्यांनी शरद पवारांची भेटही घेतली होती.

परंतु, महाविकास आघाडीने बजरंग सोनवणे यांना उमेदवारी जाहीर केली.  यानंतर ज्योती मेटेंना वंचित आघाडीकडून तिकीट मिळेल असेही सांगितले जात होते. परंतु वंचित आघाडीने पक्षाचे मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगे पाटील यांना उमेदवारी जाहीर केली. आत यानंतर ज्योती मेटे काय निर्णय घेणार, अपक्ष म्हणून निवडणूक लढणार का अशी चर्चा सुरू झाली होती. आज अखेर या चर्चांना पूर्णविराम मिळाला. ज्योती मेटे यांनी पत्रकार परिषद घेत लोकसभा निवडणूक लढणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

“त्यांना माझ्या शुभेच्छा पण, निवडणुका फक्त”.. सोनवणेंना तिकीट मिळताच पंकजा मुंडेंनी काय सांगितलं?

दरम्यान, ज्योती मेटे यांच्या या निर्णयानंतर महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. ज्योती मेटे निवडणुकीत उभ्या राहिल्या असत्या तर महायुतीच्या मतांचे विभाजन होण्याची शक्यता होती. परंतु, त्यांच्या या निर्णयानंतर मतविभाजनाचा धोका टळल्याचे सांगण्यात येत आहे.

follow us

वेब स्टोरीज