Beed Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हम साथ साथ है म्हणत एकी दाखवण्याचा प्रयत्न महायुतीच्या नेत्यांकडून होतोय. पण या एकीत अशा काही घटना घडत आहेत ज्यामुळे कुठेतरी धुसफूस असल्याचे समोर येत आहे. आताही छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुतीतील नाराजीच्या बातम्या येत आहेत. भारतीय जनता पार्टीच्या दबावामुळे शिवसेनेच्या विद्यमान खासदारांचे तिकीट कापण्यात आले. या राजकारणाला कंटाळून माजी मंत्री सुरेश नवले यांनी शिंदेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र केला होता. त्यानंतर आता महायुतीला धक्का देणारी आणखी एक बातमी आली आहे. सुरेश नवले यांनी बीड लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांना पाठिंबा जाहीर केला आहे.
Beed Lok Sabha : बीडच्या मैदानात वंचित आघाडीची एन्ट्री! अशोक हिंगेंची उमेदवारी जाहीर
सुरेश नवले यांनी मागील आठवड्यात पत्रकार परिषद घेत राजीनाम्याची घोषणा केली होती. 29 एप्रिल रोजी बीड येथे मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात पुढील निर्णय घेण्यात येईल असे नवले यांनी सांगितले होते. शिवसेनेत पाच वेळा खासदार असलेल्यांना सर्वेक्षणाचे अहवाल दाखवून शिवसेनेचे उमेदवार ठरवण्याचे काम भाजप करत आहे. भाजपाच्या या दबावाच्या राजकारणाने शिवसैनिक नाराज झाले आहेत. आता तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा शिवसैनिकांचं ऐकत नाहीत. त्यामुळे व्यथित होऊन मी पक्ष सोडत असल्याचे नवले यांनी या पत्रकार परिषदेत सांगितले होते.
यानंतर आता त्यांनी निवडणुकीत महायुतीलाच धक्का देण्याचं प्लॅनिंग केलं. बीड लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. नवले यांची बीडमध्ये मोठी ताकद आहे. त्यांना मानणारा मोठा वर्ग या भागात आहे. त्यांनी सोनवणेंना पाठिंबा दिल्याने महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्या अडचणी मात्र वाढणार आहेत. काल येथे आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात सुरेश नवले यांनी आगामी विधानसभा निवडणूक लढणार असल्याचीही घोषणा केली.
ज्योती मेटेंचा लोकसभा न लढवण्याचा निर्णय; पंकजा मुंडेंचे अर्धे टेन्शन संपले!
दरम्यान, सुरेश नवले यांच्या या निर्णयाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का बसला आहे. तर भाजपाच्याही अडचणी वाढल्या आहेत. याआधी बीडमधून माघार घेण्याची घोषणा शिवसंग्राम पक्षाच्या नेत्या ज्योती मेटे यांनी केली होती. त्यामुळे पंकजा मुंडेंचे टेन्शन कमी झाले होते. परंतु, आता सुरेश नवले यांच्या पाठिंब्याने नवीन टेन्शन निर्माण झाले आहे.