CM शिंदेंना धक्का! भाजपाचं दबावाचं राजकारण नाकारत माजी मंत्र्याचा राजीनामा

CM शिंदेंना धक्का! भाजपाचं दबावाचं राजकारण नाकारत माजी मंत्र्याचा राजीनामा

Maharashtra Lok Sabha Election : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हम साथ साथ है म्हणत एकी दाखवण्याचा प्रयत्न महायुतीच्या नेत्यांकडून होतोय. पण या एकीत अशा काही घटना घडत आहेत ज्यामुळे कुठेतरी धुसफूस असल्याचे समोर येत आहे. आताही छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुतीतील नाराजीच्या बातम्या येत आहेत. भारतीय जनता पार्टीच्या दबावामुळे शिवसेनेच्या विद्यमान खासदारांचे तिकीट कापण्यात आले. मित्रपक्षाच्या या दबावाच्या राजकारणाविरोधात आवाज उठवल्याने काही नेत्यांनी बहिष्कार टाकला. त्यामुळे शिवसेनेला जय महाराष्ट्र केला, अशी माहिती माजी मंत्री सुरेश नवले यांनी दिली.

सुरेश नवले यांच्या या निर्णयाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का बसला आहे. छत्रपती संभाजीनगर मतदारसंघात शिंदे गटाने मंत्री संदिपान भुमरे यांना तिकीट दिले आहे. महाविकास आघाडीने माजी खासदार चंद्रकांत खैरे यांना तर एमआयएमने विद्यमान खासदार इम्तियाज जलील यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. अशा परिस्थितीत येथील लढत तिरंगी झाली आहे. त्यामुळे आगामी काळात पक्षातील धुसफूस कमी करून एकसंघपणे निवडणुकीला सामोरे जाण्याची गरज आहे. परंतु, तसे काही घडत नाही.

Madha Loksabha : देवेंद्र फडणवीसांना पुन्हा धक्का! आणखी एक धनगर नेता शरद पवारांच्या गोटात…

शिंदे शिवसैनिकांचं ऐकत नाहीत

सुरेश नवले यांनी पत्रकार परिषद घेत राजीनाम्याची घोषणा केली. 29 एप्रिल रोजी बीड येथे मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात पुढील निर्णय घेण्यात येईल असे नवले यांनी सांगितले. शिवसेनेत पाच वेळा खासदार असलेल्यांना सर्वेक्षणाचे अहवाल दाखवून शिवसेनेचे उमेदवार ठरवण्याचे काम भाजप करत आहे. भाजपाच्या या दबावाच्या राजकारणाने शिवसैनिक नाराज झाले आहेत. आता तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा शिवसैनिकांचं ऐकत नाहीत. त्यामुळे व्यथित होऊन मी पक्ष सोडत आहे, असे नवले यांनी सांगितले.

छत्रपती संभाजीनगर मतदारसंघातही याच राजकारणाचा प्रयत्न सुरू होता. हा मतदारसंघ मित्र पक्ष घेण्याच्या तयारीत होता. परंतु, ऐनवेळी आवाज उठवल्याने हा मतदारसंघ शिवसेनेला मिळाल्याचे माजी मंत्री सुरेश नवले यांनी या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

Baramati Loksabha : पिढीला जन्म देणारी सून बाहेरची कशी? अजितदादांचा शरद पवारांना टोला

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube