Manoj Jarange Criticized Devendra Fadnavis : विधानसभा निवडणूक अगदी तोंडावर आली आहे. त्यामुळे राजकीय घडामोडी वेगाने घडू लागल्या आहेत. यातच आता मनोज जरांगे पाटील यांनी (Manoj Jarange Patil) महत्वाची घोषणा केली आहे. येत्या ३ तारखेला आम्ही भूमिका जाहीर करणार आहोत. ३ तारखेला उमेदवार आणि मतदारसंघ जाहीर करणार आहोत, अशी माहिती मनोज जरांगे यांनी दिली. यानंतर त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर जोरदार टीका केली. देवेंद्र तात्यांकडून मी भरपूर शिकलोय अशी खोचक टीका जरांगे यांनी केली.
आज आंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटील यांच्या उपस्थितीत मुस्लीम आणि बौद्ध धर्मगुरू यांची एक महत्वाची बैठक पार पडली. आगामी विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Elections 2024) अनुषंगाने ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीनंतरील पत्रकार परिषदेत मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. जरांगे पाटील पुढे म्हणाले, ज्यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे त्यातील एकच राहिल बाकीच्यांनी अर्ज काढायचे आहेत. मराठ्यांनी इथून पुढं आझाद म्हणून जगावं. आता परिवर्तन होणार आहे. आम्ही लोकशाहीच्या मार्गानेच चाललो आहोत. कधीच जात पाहणार नाही.
Manoj Jarange : अखेर उपोषण स्थगित; मनोज जरांगे यांचा मोठा निर्णय, म्हणाले कोर्टाचा आदर करतो
देवेंद्र तात्यांनी मला खूप काही शिकवलं आहे. तो फार हलक्यात घेतो आम्हाला केव्हाही. मात्र आता गरिबांची लाट आहे. समाजाने मागे सरकू नये. जनतेचा एकही प्रश्न बाकी ठेवणार नाही. विधानसभा निवडणुकीसाठी मराठा, दलित आणि मुस्लीम समाजाने एकत्रित येऊन काम करावं असे आवाहन जरांगे पाटील यांनी केले.
ज्याचा त्याचा धर्म ज्याच्या त्याच्या जवळ ठेवला पाहिजे. आम्ही हिंदू असूनही आमची गरज फक्त कुटाकुटीसाठी आहे. आरक्षणाला आम्ही सरकारला लागत नाही. आम्ही धर्म परिवर्तन नाही सत्ता परिवर्तन करण्यासाठी एकत्र आलो आहोत. लिंगायत, बंजारा, धनगर महानुभाव पंथाचे बांधव यांनीही आमच्याकडे यावं. अशी लाट 75 वर्षात आली नाही अशी लाट पुन्हा पुढील 75 वर्ष येणार नाही. आमच्यात शिक्कामोर्तब झाले.
जिथे मराठा उमेदवार उभे राहतील तिथे दलित मुस्लिम मतदान करणार. जिथे दलित उमेदवार आहे तिथे मराठा आणि मुस्लिम मतदान करणार आणि जिथे मुस्लिम उमेदवार असेल तिथे मराठा आणि दलितांनी ताकदीनं मतदान करावं. 100 टक्के मतदान करावे लवकरच आम्ही मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रात सभा घेणार आहोत अशी माहिती जरांगे यांनी दिली.
मनोज जरांगे कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवणार?, लेट्सअप मराठीशी बोलताना केला मोठा खुलासा