Ravsaheb Danve on Arjun Khotkar : केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. दानवेंनी प्रचाराला सुरुवात केली आहे. रणरणत्या उन्हात कधी अनवाणी, कधी डोळ्यांना गॉगल तर कधी चक्क बैलगाडीतून प्रचाराचा गावरान तडका.. असा लूक दानवेंचा दिसतो. निवडणुकीच्या काळात अन्य नेत्यांचे रुसवेफुगवे काढण्यातही त्यांनी कसर ठेवलेली नाही. मध्यंतरी शिवसेना नेते अर्जुन खोतकर आणि दानवेंचे एकत्रित फोटो प्रसिद्ध झाले होते. दोघांतील वाद मिटल्याचा मेसेज या फोटोतून गेला त्यानंतर आज हे दोन्ही नेते प्रचारातही दिसले
जालन्यातील गोलापांगरी येथे दोन्ही नेत्यांनी सभेत जोरदार भाषणे ठोकली. यातील मंत्री दानवेंच्या भाषणाची जोरदार चर्चा होत आहे. दानवे म्हणाले, वाटत असेल तर पुढल्या वेळी अर्जुन खोतकरांनाच खासदार करा आणि मला आमदार करा. मी राजकारणातली सासू आहे. अर्जुनराव माझी सून आहेत. एकदा सुनेच्या हातात कारभार गेला की सासूला फक्त आणायचं सांगतात. वाटायला सुना असतात, असे दानवेंनी म्हणताच सभेत जोरदार हशा पिकला.
“भाजप करो ना करो, आम्ही लोकसभेसाठी काम करणार”; गुलाबरावांचा कार्यकर्त्यांना क्लिअर मेसेज
जालना मतदारसंघात भाजपने पुन्हा केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांना उमेदवारी दिली आहे. तर महाविकास आघाडीने पारंपारिक प्रतिस्पर्धी कल्याण काळे यांना तिकीट दिलं आहे. दोघांतच लढत होईल असे वाटत असतानाच अपक्ष म्हणून आणखी एका उमेदवाराने रिंगणात उडी घेतली. त्यामुळे आता येथे तिरंगी लढत झाली आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी स्लतःचे वाहन जाळणारे मंगेश साबळे अपक्ष म्हणून रिंगणात आहेत. आता मंगेश साबळेंच्या उमेदवारीमुळे कुणाला फटका बसणार याचं उत्तर ४ जूनलाच मिळेल.
मात्र, याआधी शिंदे गटाचे नेते अर्जुन खोतकर सोबत आल्याने दानवेंच्या अडचणी काही प्रमाणात कमी होतील असे सांगण्यात येत आहे. आता दोन्ही नेते आपसातील वैमनस्य विसरून प्रचारसभांत एकत्र दिसू लागले आहेत. त्यामुळे महायुतीच्या अडचणी कमी झाल्याची चर्चा आहे. मात्र या मतदारसंघात मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचाही प्रभाव आहे. हा प्रभाव दानवेंसाठी अडचणीचा ठरू शकतो. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी मोठं आंदोलन केलं होतं. त्यावेळी राज्य सरकारच्या कारभारावर मराठा समाज नाराज झाला होता.
“दोन वर्षांपासून आमचं धान्य बंद का? त्याचं उत्तर द्या” लाभार्थ्यांनी दानवेंना विचारला जाब