“भाजप करो ना करो, आम्ही लोकसभेसाठी काम करणार”; गुलाबरावांचा कार्यकर्त्यांना क्लिअर मेसेज

“भाजप करो ना करो, आम्ही लोकसभेसाठी काम करणार”; गुलाबरावांचा कार्यकर्त्यांना क्लिअर मेसेज

Jalgaon Lok Sabha Election : राज्यात लोकसभा निवडणुकांचा (Jalgaon Lok Sabha Election) प्रचार सुरू आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि शिवसेनेचे मंत्री महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करत आहेत. यात भाजपाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठीही शिंदे जातीने हजर असतात. लोकसभा निवडणुकीत शिंदे गट भाजपला मदत करतोय असा मेसेज गेला आहे. पण, विधानसभा निवडणुकीत अशीच मदत भाजप शिंदे गटाला करणार का? असा कळीचा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. तशा चर्चा कानी पडत आहेत. या चर्चांवर स्पष्टीकरण त्यांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी (Gulabrao Patil) केला.

Jalgaon LokSabha : उन्मेश पाटलांऐवजी करण पवारांना संधी; ठाकरेंच्या मनात नक्की काय?

पाटील पुढे म्हणाले, आम्ही एका बापाची औलाद आहोत. भाजप काम करो अथवा न करो आम्ही मात्र इमानदारीने लोकसभेचे काम करणार आहोत. देशात आम्हाला पुन्हा एकदा भगवा फडकावयचा आहे. आम्ही गद्दारी आयुष्यात कधीच करू शकत नाही. आम्हाला जे काही करायचं होतं ते आम्ही शिंदे साहेबांसोबत जाऊन उद्धव ठाकरेंना करून दाखवलं आहे.

लोकसभा निवडणुकीत शिवसेना शिंदे गट भाजपला तर मदत करत आहे पण पुढे विधानसभा निवडणुकीत भाजप शिवसेनेला अशीच मदत करणार का, अशी शंका जळगावमधील कार्यकर्त्यांच्या मनात होती. या शंकांचे निरसन करण्याचा प्रयत्न गुलाबराव पाटील यांनी केला. ते म्हणाले, भाजप काम करो अथवा न करो आम्ही मात्र इमानदारीने लोकसभेचे काम करणार आहोत. देशात आम्हाला पुन्हा एकदा भगवा फडकावयचा आहे.

रोहित पवार यांचा गुलाबराव पाटील यांच्याविरोधात 100 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा

follow us
  • fb
  • instagram
  • youtube