“दोन वर्षांपासून आमचं धान्य बंद का? त्याचं उत्तर द्या”; लाभार्थ्यांनी दानवेंना विचारला जाब

“दोन वर्षांपासून आमचं धान्य बंद का? त्याचं उत्तर द्या”; लाभार्थ्यांनी दानवेंना विचारला जाब

Jalna Lok Sabha Election 2024 : राज्यात लोकसभा निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू आहे. कडाक्याच्या उन्हाळ्यात (Jalna Lok Sabha Election 2024) उमेदवारांसाठी स्टार प्रचारक रॅली अन् सभा घेत आहेत. काही मतदारसंघात केंद्रीय मंत्रीच रिंगणात आहेत. त्यातीलच एक मतदारसंघ म्हणजे जालना. या मतदारसंघात केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांना (Ravsaheb Danve) भाजपने उमेदवारी दिली आहे. उमेदवारी मिळाल्यापासून दानवेंनी प्रचाराचा धडाका सुरू केला आहे. काही ठिकाणी नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. तर काही ठिकाणी नागरिक आता जाब विचारू लागले आहेत. असाच प्रकार सोयगाव तालुक्यातील जरंडी येथे सोमवारी घडला.

या ठिकाणी जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी लाभार्थी चांगलेच संतापल्याचे दिसले. दोन वर्षांपासून आम्हा शेतकऱ्यांना दुष्काळात धान्य मिळत नाही. आमचे रेशनचे धान्य सुद्धा बंद केले आहे. 80 कोटी लोकांना केंद्र सरकारने मोफत धान्य वाटप केल्याच्या गप्पा आम्हाला सांगू नका. आमचं धान्य का बंद आहे, याचं उत्तर द्या असा जाब या लाभार्थींनी दानवेंना विचारला.

Sanjay Raut : ‘तुमच्यासारखी माणसं सरकारच्या ताटाखालचं मांजर’.. राऊतांचा नार्वेकरांवर हल्लाबोल

या अवघड प्रश्नांवर काय उत्तर द्यावं हे दानवेंना सुचेना. तेव्हा आधी ऐकून तर घ्या. ऐकून घेतल्याशिवाय कसं समजेल असे उत्तर देत त्यांनी वेळ मारून नेली. यावेळी मंत्री अब्दुल सत्तार देखील उपस्थित होते. यावेळी भाषणात दानवेंनी केंद्र सरकारच्या योजनांची माहिती नागरिकांना दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशातील जनतेला 2022 पर्यंत मोफत धान्य दिले. असे दानवे यांनी सांगताच लाभार्थ्यांनी आम्हाला दोन वर्षांपासून आम्हाला रेशनचे धान्य मिळत नाही ते आधी सुरू करा. दुष्काळात धान्य मिळत नाही आम्ही काय खायचं असे विचारले. अचानक प्रश्नांची सरबत्ती सुरू झाल्याने काय उत्तर द्यावं हे दोन्ही मंत्र्यांना सुटेना.

लाभार्थ्यांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे सभेतील वातावरण काही काळ गोंधळाचे झाले होते. या लाभार्थ्यांना शांत करण्याचा प्रयत्न सुरू होता. तेव्हा आधी ऐकून तर घ्या. ऐकून घेतल्याशिवाय कसं समजेल असे उत्तर देत त्यांनी वेळ मारून नेली. परंतु, या प्रकाराची माहिती थोड्याच वेळात जिल्हाभरात पोहोचली. यानंतर काल दिवसभर मतदारसंघात याच प्रकाराची चर्चा सुरू होती.

‘आमचं ऑपरेशन कळत नाही अन् कळलं तर.. दानवेंच्या पक्षांतराच्या चर्चा फडणवीसांनी टोलवल्या

follow us
  • fb
  • instagram
  • youtube