Download App

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून राज्यसेवा मुख्य लेखी परीक्षेचा निकाल जाहीर, ‘या’ संकेतस्थळावर पाहता येणार

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे दिनांक २०, २१ व २२ जानेवारी, २०२४ रोजी घेण्यात आलेल्या राज्य सेवा (मुख्य) परीक्षा - २०२३ चा निकाल जाहीर झाला.

  • Written By: Last Updated:

MPSC Mains result 2023 : राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023- लेखी परीक्षेचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलाय. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे दिनांक २०, २१ व २२ जानेवारी, २०२४ रोजी घेण्यात आलेल्या राज्य सेवा (मुख्य) परीक्षा – २०२३ चा लेखी परीक्षेचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. (MPSC) मुख्य परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थी मुलाखतीसाठी पात्र झाले आहेत. (result ) मुलाखतीचा सविस्तर कार्यक्रम आयोगाच्या ( https://mpsc.gov.in) या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल, असं आयोगाकडून सांगण्यात आलंय.

मुख्य परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थी मुलाखतीसाठी पात्र झाले आहेत. मुलाखतीचा सविस्तर कार्यक्रम आयोगाच्या (https://mpsc.gov.in)या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल, असं आयोगाकडून सांगण्यात आलं आहे.

भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बरबाद झाली; कवी सुर्वेंचं घर आहे माहिती असतं तर असं केलं नसत

राज्य सेवा मुख्य परीक्षेच्या निकालानुसार मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची वैद्यकीय तपासणी मुलाखतीच्या टप्प्यावर आयोगाकडून करण्यात येईल. त्या अनुषंगाने उमेदवारांना वैद्यकीय चाचणीची तारीख व ठिकाण आयोगाकडून कळवण्यात येणार आहे.

निकालानुसार मुलाखतीसाठी प्रथमदर्शनी पात्र ठरलेल्या सर्व उमेदवारांना त्यांच्या परीक्षेच्या आवेदनपत्रातील दाव्याच्या पृष्ठ्यर्थ मुलाखतीच्या वेळी त्यांची पात्रता मूळ प्रमाणपत्रावरून तपासण्याच्या अटीच्या अधीन राहून मुलाखतीस बोलावण्यात येणार आहे, असं आयोगाकडून सांगण्यात आलं आहे. लेखी परीक्षेच्या निकालाआधारे मुलाखतीस पात्र ठरलेल्या उमेदवारांचा मुलाखत कार्यक्रम स्वतंत्रपणे प्रसिध्द करण्यात येणार आहे.

पूजा खेडकरच पिंपरी-चिंचवड कनेक्शन; महापालिकेच्या ‘या’ रुग्णालयातूनही घेतलं दिव्यांग प्रमाणपत्र

मुख्य परीक्षेमधून मुलाखतीसाठी अर्हताप्राप्त न ठरलेल्या ज्या उमेदवारांना त्यांच्या उत्तरपुस्तिकेतील गुणांची फेरपडताळणी करावयाची आहे अशा उमेदवारांनी गुणपत्रकं प्राप्त झाल्याच्या दिनांकापासून १० दिवसांच्या आत आयोगाकडे ऑनलाईन पध्दतीने विहित नमुन्यात अर्ज करणं आवश्यक आहे

follow us

संबंधित बातम्या