भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बरबाद झाली; कवी सुर्वेंचं घर आहे माहिती असतं तर असं केलं नसत

भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बरबाद झाली; कवी सुर्वेंचं घर आहे माहिती असतं तर असं केलं नसत

Poet Narayan Surve : एक कवी आयुष्यात काय कमावतो? त्याची कमाई काय? धन, संपत्ती, जमीन बंगले? यापैकी काय असती कवीची ओळख? तुम्ही म्हणालं असे प्रश्न का विचालेत. पण ही घटनाच तशी आहे. (theft) रोजच्या संघर्षाचे कितीही चटके बसले तही असंख्य लोकांना कायम जगण्याचं बळ देणारा म्हणजे कवी. (Narayan Surve) आणि हीच असते एका कवीची ओळख. “कवितेऐवजी रद्दी विकली असती तर बरं झालं असतं निदान देणेकऱ्यांचे तगादे तरी चुकवता आले असते या ओळी अशाच नव्हत्या लिहील्या प्रख्यात दिवंगत कवी पद्मश्री नारायण सुर्वे यांनी. त्यांनी लाख संकट झेलली असली तरी सामन्य माणसाच्या जगण्यातील ओल कमी होऊ नाही आयुष्यभर ते कवीतेतून काहीतरी देत राहीले. आज तीच त्यांची खरी ओळख उरली.

चोर खजील झाला IAS पूजा खेडकरसह अन्य पाच अधिकाऱ्यांचीही सोशलवर चर्चा; नेमकं कारण काय?

तसं पाहिलं तर आयुष्यभराची कमाई म्हणजे लाखमोलाची शब्दसंपत्ती. ‘भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बरबाद झाली’ असं म्हणणाऱ्या सुर्वेंना अखेरच्या क्षणापर्यंत झळ सोसावी लागली. त्यानंतर त्यांना नेरळमध्ये हक्काचं घर मिळालं, पण त्याच घरात चोरी झाली. मात्र, अशा फाटक्या माणसाच्या घरात काय मिळालं तर पुस्तकं. त्यावरून हा चोरही खजील झाला. त्या चोराला जेव्हा समजले, हे कविवर्य नारायण सुर्वेंचे घर आहे तेव्हा त्याने चोरलेला सर्व मुद्देमाल परत करण्याची कबुली देणारी चिठ्ठीच घराच्या भिंतीवर चिकटवली. काय कमावलं नारायण सुर्वे नावाच्या कवीने तर ही त्यांची खरी संपत्ती. चोरालाही आपल्या कृत्याची लाज वाटावी.

सलग दोन-तीन दिवस चोऱ्या

त्याचं झाले असं की, येथील गंगानगर परिसरात नारायण सुर्वे यांचं घर आहे. या घरात त्यांची मुलगी सुजाता आणि जावई गणेश घारे राहतात. घारे दाम्पत्याने सुर्वे यांच्या सर्व स्मृती या घरात जपून ठेवल्या आहेत. घारे दाम्पत्य दहा दिवसांसाठी मुलाकडे विरार येथे गेले होते. घर बंद असल्याचं पाहत चोराने शौचालयाची खिडकी फोडून सुर्वे यांच्या घरात शिरकाव केला. दागदागिने, पैसे सापडले नाहीत म्हणून त्याने एलईडी टीव्ही, तांब्या-पितळ्याच्या वस्तू, भांडी तसंच धान्याकडे मोर्चा वळवला. सलग दोन-तीन दिवस चोराच्या घरात वाऱ्या सुरू होता.

फोटो दिसला अन्… भाजप नेते हर्षवर्धन पाटलांचं वादग्रस्त विधान; इचलकरंजीची केली पाक व्याप्त काश्मिरशी तुलना

चोराला भिंतीवर नारायण सुर्वे यांचा फोटो, त्यांना मिळालेले पुरस्कार, स्मृतिचिन्हे, मानपत्रे वगैरे दिसून आले. त्यानंतर हे घर कविवर्य नारायण सुर्वे यांचं असल्याचं त्याच्या लक्षात आलं. आपल्या कृतीचा पश्चात्ताप झालेल्या चोराने मग चोरून नेलेल्या वस्तू एकेक करून परत आणायला सुरुवात केली. त्यामध्ये टीव्ही पुन्हा जागेवर आणून ठेवला. तसंच, भिंतीवर एक चिठ्ठी चिकटवून आपल्या मनातील भावना मोकळ्या केल्या. चोरीचा हा प्रकार घारे दाम्पत्य रविवारी घरी आल्यानंतर समोर आला.

चिठ्ठीत काय आहे ?

मला माहिती नव्हतं की, नारायण सुर्वे यांचं हे घर आहे, नाही तर मी चोरी केली नसती. मला माफ करा. मी, जी वस्तू तुमची घेतली आहे ती मी परत करत आहे. मी टीव्ही पण नेला होता परंतु आणून ठेवला. सॉरी… अशा शब्दांत चोराने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. दरम्यान,  या चोरी संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चोराने आणून ठेवलेल्या टीव्हीचे फिंगर प्रिंट, तसंच नेरळ शहरातील सीसीटीव्हीच्या आधारे तपास सुरू आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

संबंधित बातम्या