Nitin Gadkari Death Thread : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना मागील 3 महिन्यांपासून येत असलेल्या धमकी आणि खंडणीचे फोन येत आहेत. त्यासाठी नागपूर पोलिसांनी तपास कार्य सुरू होते. आता या प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. नागपूर पोलिसांनी आणखी दोन जणांना ताब्यात घेतलं आहे. या अगोदर देखील पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) या बंदी असलेल्या संघटनेशी संपर्क असलेल्या जयेश पुजारी उर्फ जयेश कांथा उर्फ शाकीर याने फोनमधील एका सॉफ्टवेअरचा वापर करुन गडकरी यांना धमकी दिल्याचे आणि त्यांच्याकडे खंडणी मागितल्याचे समोर आले होते. ( Nagpur Police Succeed in arrest to one more accused in Nitin Gadkari Death Thread )
राहुल गांधींची सुप्रीम कोर्टात धाव, शिक्षेला स्थगिती देण्याची मागणी
त्यानंतर आता नागपूर पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपीच नाव समोर आलं आहेत. बशिरूद्दिन नूर अहमद उर्फ अफसर पाशा याला पोलिसांनी बेळगाव तुरूंगातून ताब्यात घेतलं आहे. तो कर्नाटकामध्ये लष्कर-ए-तोयबासाठी काम करतो. तो चिकबल्लापूर इथ राहत असून त्याच्यावर ढाका आणि बंगळुरू बॉम्ब ब्लॉस्टसह लष्कर-ए-तोयबासाठी भरती करत असल्याचा आरोप आहे.
अधिवेशनासाठी अजित पवार गटाची बैठक, अनिल पाटील बजावणार व्हीप; पवार गटातील MLA हजर राहणार?
बशिरूद्दिन नूर अहमद उर्फ अफसर पाशा हाच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना मागील 3 महिन्यांपासून जयेश पुजारी उर्फ जयेश कांथा याच्या माध्यमातून धमकी देत असल्याचं पोलिसांनी समोर आणलं आहे. पाशा हा पुजारीचं ब्रेन वॉश करत होता. त्याला कट्टर इस्लामिक विचारसरणीशी जुळवत होता. अशी माहिती पुजारीच्या जवळच्या व्यक्तींनी दिल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे.
कोण आहे जयेश पुजारी?
जयेश पुजारी उर्फ जयेश कांथा हा मुळचा कर्नाटकच्या दक्षिण कन्नड जिल्ह्याचा रहिवासी. २०१२ पासून तो बेळगावच्या विविध कारागृहांमध्ये शिक्षा भोगत आहे. नागपूर पोलिसांनी ताब्यात घेण्यापूर्वी तो बेळगावच्या कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत होता. दुहेरी हत्याकांडातील तो आरोपी आहे. नितीन गडकरी यांना धमकी दिल्याप्रकणी आणि खंडणी मागितल्याच्या प्रकरणात त्याला अटक करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, मागील १० वर्षांपासून जयेश पुजारी पीएफआयच्या विविध पदाधिकाऱ्यांच्या संपर्कात येत गेला. २०१४ ते २०१८ मध्ये जयेशचा संपर्क टी. नासिर उर्फ कॅप्टन आणि फारुख नावाच्या पीएफआयच्या कॅडरसोबत आला. या दोघांनीच जयेशला बॉम्ब बनविण्याचे प्रशिक्षण दिले. या दरम्यान, त्याचे धर्मपरिवर्तनही करण्यात आले. त्यानंतर त्याचे नाव शाकीर ठेवण्यात आले. नॅशनल एक्सिकेटिव्ह कॉऊन्सिलचा सचिव असलेल्या मोहम्मद अफसर पाशाने त्याचा ब्रेन वॉश केला. त्याला कट्टरवादी विचारसरणीकडे ओढले आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविषयी द्वेष निर्माण केला. बेळगावमध्ये असताना तो मृदुल, युसूफ आणि राशिद मलबारी यांच्याही संपर्कात आला.
यानंतर मागील वर्षी पीएफआय बंदी आल्यानंतर जयेश पुजारीच्या मनात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविषयी तीव्र राग निर्माण झाला. याच रागातून त्याने धमकी देण्याचा प्लॅन केला. टार्गेट निवडलं नितीन गडकरी. त्यानंतर त्याने तुरुंगातून मोबाईलवरुन नितीन गडकरी यांना धमकी देणारे फोन केले. त्याच्या फोनमध्ये विशेष सॉफ्टवेअर इंस्टॉल करण्यात आले होते. याच माध्यमातून तो गडकरी यांना धमकी देत होता. तुरुंगातूनच तो आपल्या कुटूंबाला व्हिडीओ कॉल व व्हॉईस कॉल देखील करत असल्याची पोलिसांची माहिती आहे.
तुरुंगात मिळायची 5 स्टार सेवा
मिळालेल्या माहितीनुसार, जयेश पुजारीला तुरुंगात 5 स्टार सुख सुविधा मिळत होत्या. तुरुंगात तो स्मार्ट फोन वापरायचा. तुरुंगातूनच तो आपल्या कुटूंबाला आणि मित्रांना व्हिडीओ कॉल व व्हॉईस कॉल करायचा. तुरुंगात त्याला मागेल तेव्हा मांसाहार मिळायचा. जयेशच्या याच सर्व ऐशोआरामवर तब्बल १८ लाख रुपये खर्च आला. पण त्याच्यावर हा खर्च नेमका केला कोणी? असा सवाल सध्या विचारला जात आहे.