अधिवेशनासाठी अजित पवार गटाची बैठक, अनिल पाटील बजावणार व्हीप; पवार गटातील MLA हजर राहणार?

अधिवेशनासाठी अजित पवार गटाची बैठक, अनिल पाटील बजावणार व्हीप; पवार गटातील MLA हजर राहणार?

मुंबई : राज्य विधीमंडळाच्या (State Legislature) पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर अजित पवार (Ajit Pawar) गटाने उद्या पक्षाची बैठक बोलावली आहे. पक्षाचे प्रतोद अनिल पाटील हे सर्व आमदारांना बैठकीला उपस्थित राहण्यासाठी व्हीप जारी करणार आहेत, अशा स्थितीत शरद पवार गटाचे आमदार या बैठकीला उपस्थित राहणार की नाही, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष असणार आहे. (ajit pawar group called Mla meeeting for State Legislature sesision)

काही दिवासांपूर्वी अजित पवार यांनी आपल्या समर्थक आमदारासंह राष्ट्रवादीत बंडखोरी करुन शिंदे-फडणवीस सरकारशी हातमिळवणी केली. त्यानंतर अजित पवारांनी थेट पक्षावरच दावा ठोकला. दरम्यान, 35 ते 40 आमदार अजित पवार यांच्यासोबत असल्याचे सांगण्यात येत आहे. शरद पवार गटाकडे 13 ते 14 आमदार असल्याचे बोलले जाते. त्यामुळे आमदारांना आपल्या बाजूने घेण्यासाठी शरद पवार आणि अजित पवार गटात रस्सीखेच सुरू आहे.

सोमवारपासून (17 जुलै) पासून विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर पावसाळी अधिवेशनातील रणनीती ठरवण्यासाठी अजित पवार गटाने सर्व आमदार-खासदारांची बैठक बोलावली आहे. पक्षाच्या या बैठकीला सर्व आमदारांना मुंबईत उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आलेत. यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतोद आणि राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल भाईदास पाटील हे सर्व आमदारांना व्हीप बजावणार आहेत. त्यामुळे शरद पवार यांच्यासोबत असलेले आमदारही या बैठकीला येतात की नाही हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Ahmednagar Fake Degree : अहमदनगरमध्ये बनावट पदव्या विक्रीचं रॅकेट उघड; थेट दिल्लीतून चालायचा धंदा 

शरद पवार गटाकडून 12 आमदारांना नोटीस

दरम्यान, शरद पवार गटानेही शुक्रवारी ५ जुलै रोजी झालेल्या बैठकीला गैरहजर राहून पक्षविरोधी कारवाई केली, त्यामुळे अजित पवार गटातील १२ आमदारांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. यामध्ये आमदार सुनील शेळके, दिलीप बनकर, नितीन पवार, दीपक चव्हाण, इंद्रनील नाईक, यशवंत माने, शेखर निकम, राजू कारेमोरे, मनोहर चंद्रकापुरे, संग्राम जगताप, राजेश पाटील, माणिकराव कोकाटे आदींचा समावेश आहे.

विरोधक चहापानावर बहिष्कार टाकणार?
राज्य विधी मंडळाचे अधिवेशन 17 जुलै ते 4 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. विधिमंडळ अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापानाचा कार्यक्रम आयोजित केला जातो. विरोधक अनेकदा चहापानावर बहिष्कार टाकतात. ठाकरे गट, शरद पवार गट आणि काँग्रेस हे पक्ष विरोधात आहेत. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला नेहमीप्रमाणे मुख्यमंत्री विरोधकांना चहापानाचे निमंत्रण देणार आहेत. मात्र,विरोधक चहापान करतात की, नेहमीप्रमाणे बहिष्कार टाकणार, हे पाहावं लागेल.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube