सर्व आमदार आमच्याशी बोललेत, त्यांना…; जयंत पाटील यांची पत्रकार परिषदेत मोठी माहिती

 NCP Political Crisis : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी बंड करत आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. जयंत पाटील म्हणाले की, पक्षातील काही सदस्यांनी मंत्रिमंडळात जाण्याचा निर्णय स्वतः घेतलेला दिसतोय आणि मंत्रिमंडळात पक्षाच्या मान्यते शिवाय सत्तारूढ पक्षाकडे जाऊन शपथविधीचा हा आजचा […]

Jayant Patil : प्रसिद्धीशिवाय लोकांसमोर जाण्याचा चान्स राहिलेला नाही; जयंत पाटलांनी टाकला उलट फासा

Jayant Patil

 NCP Political Crisis : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी बंड करत आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. जयंत पाटील म्हणाले की, पक्षातील काही सदस्यांनी मंत्रिमंडळात जाण्याचा निर्णय स्वतः घेतलेला दिसतोय आणि मंत्रिमंडळात पक्षाच्या मान्यते शिवाय सत्तारूढ पक्षाकडे जाऊन शपथविधीचा हा आजचा कार्यक्रम झालेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून महाराष्ट्रातल्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने आणि विधानसभेच्या विधिमंडळ पक्षाचा गटनेता या नात्याने मी आपणाला ठामपणे सांगतो की, विधिमंडळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, पक्षाचे सर्व कार्यकर्ते तर फार मोठ्या संख्येने झालेल्या घटनेतून व्यथित  झाले असून यासंदर्भात आपल्या प्रतिक्रिया महाराष्ट्रभर देत आहेत.

महाराष्ट्रातले कार्यकर्ते एकसंघ पणाने शरद पवार साहेबांच्या बरोबर आहेत. ही भूमिका जागोजागी महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात पुन्हा एकदा व्यक्त करतात. मला खात्री आहे की आज जो शपथविधी झाला त्याला ज्या सदस्यांना बोलवून घेण्यात आलं त्यांच्या कशावर सह्या घेतल्या अजून आम्हाला कळलेलं नाही,असं पाटील म्हणाले.

दिल्लीत रचला प्लॅन अन् राज्यात घडला भूकंप; अजितदादांच्या बंडामागे नेमकं काय घडलं?

पण त्यातले बरेच सदस्य जे टीव्हीवर दिसत होते, त्या कार्यक्रमात त्या सर्वांनी शरद पवार साहेबांना भेटून यासंदर्भात आम्ही गोंधळलेलो होतो अशी भूमिका व्यक्त केलेली आहे. ते पवार साहेबांशी बोललेत. काही आमदार माझ्याशी बोललेले आहेत आणि त्या सर्व आमदारांचे कन्फ्युजन असल्याचे पाटील यांनी सांगितले.

‘मी साहेबांबरोबर…’, अजित पवारांच्या शपथविधीवर जयंत पाटलांची पहिली प्रतिक्रिया…

पण आता पवार साहेबांच्या पत्रकार परिषदेमुळे हे आता स्पष्ट झालेलं आहे की या आजच्या  करण्यात आलेल्या कृतीला शरद पवार साहेबांचा किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कोणताही पाठिंबा नाहीये, आणि त्यामुळे महाराष्ट्रातल्या सर्व कार्यकर्त्यांना बुधवारी महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे सगळे पदाधिकारी आहेत त्यांची ५ तारखेला बैठक बोलावल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.

Exit mobile version