Ahilyanagar Politics : विधानसभा निवडणुकीत यश मिळवल्यानंतर भाजपने आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (Ahilyanagar Politics) निवडणुकीवर लक्ष केंद्रीत केले आहे. यातच सदस्य नोंदणी आणि जिल्हाध्यक्षांची निवड हे महत्वाचे मुद्दे पक्षाच्या अजेंड्यावर आहेत. अहिल्यानगरमध्ये यासाठी मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. जिल्हाध्यक्षपद कुणाला द्यायचं यावर मंथन सुरू झालं आहे. यासाठी पक्षाने काही निकष ठरवले आहेत. याची माहिती भाजपाचे महामंत्री विजय चौधरी यांनी दिली आहे.
जिल्हाध्यक्षपदासाठी उमेदवार पक्षाशी प्रामाणिक असला पाहिजे, जनेतशी बांधीलकी तसेच कार्यकर्त्यांशी नाळ जोडलेली पाहिजे. पक्षासाठी वेळ व पैसा खर्च करणारा नेता असणे आवश्यक आहे. म्हणजेच पक्षासाठी खऱ्या अर्थाने झटणाऱ्या कार्यकर्त्यांनाच संधी मिळणार आहे अशी स्पष्ट भूमिका भाजपचे महामंत्री विजय चौधरी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना मांडली.
भाजपच्या संघटन पर्व दौऱ्यांतर्गत अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांची बैठक चौधरी व प्रदेश पदाधिकारी रवींद्र अनासपुरे यांच्या उपस्थितीत झाली. बैठकीला आ. विक्रम पाचपुते, आ. मोनिका राजळे, शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर, दक्षिण जिल्ह्याध्यक्ष दिलीप भालसिंग, प्रदेश सचिव अरुण मुंढे, शहर उपाध्यक्ष बाबासाहेब सानप, प्रदेश सदस्य भानुदास बेरड आदी उपस्थित होते.
उद्धव ठाकरेंना दुसरा धक्का! अहिल्यानगरमधील ‘हा’ दिग्गज नेता हाती घेणार धनुष्यबाण; पक्षप्रवेश कन्फर्म
भाजपने आगामी संघटन पर्वाच्या पार्श्वभूमीवर शहराध्यक्ष, उत्तर व दक्षिण जिल्हाध्यक्ष यांच्या निवड प्रक्रियेला सुरुवात केली आहे. १५ ते २५ एप्रिल दरम्यान या नियुक्त्या करण्यात येणार असून, भाजपने या निवड प्रक्रियेसाठी विशेष निकष ठरवले आहेत. जिल्हाध्यक्षांच्या निवडीसाठी भाजपने निकष लावले असून यामध्ये प्रामाणिकतेबरोबरच निष्ठावंत, विचारांवर चालणारा, वेळ आणि पैसा खर्च करणारा हे प्रामुख्याने निकष राहतील, अशी माहिती भाजपचे महामंत्री विजय चौधरी यांनी दिली.
चौधरी म्हणाले, संघटन पर्व अभियानांतर्गत सदस्य नोंदणीसाठी उत्तर महाराष्ट्रात हा दौरा सुरू केला आहे. ६ एप्रिलला भाजपचा स्थापना दिन आहे. त्यानिमित्त १ कोटी ५१ लाख सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट पूर्ण करायचे आहे. उत्तर महाराष्ट्रासाठी २१ लाख ४६ हजार ३०४ सदस्य नोंदणी उद्दिष्ट देण्यात आले आहे.
भाजपच्या जिल्हाध्यक्षांना दीड वर्षे पूर्ण झाले किंवा दोन वर्ष तीन वर्ष पूर्ण झाले या सर्वांसाठी ही निवडणूक प्रक्रिया होणार आहे. त्यांना पुन्हा संधी द्यायची किंवा नाही हे सर्व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण हे ठरवतील, असे चौधरी यांनी सांगितले.
अहिल्यानगरमध्ये कोतकरांना मोठा दणका! नेप्ती बाजार समितीवरून नाव हटवलं